Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील विविध लोकोपयोगी विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण केले तसेच बीकेसी मैदानावर झालेल्या अतिविराट सभेला त्यांनी संबोधित केले

प्रतिनिधी जगदीश काशिकर मुंबई

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई तील ३८ हजार कोटी रुपयांच्या विविध लोकोपयोगी विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण आज (गुरूवार) केले. यानिमित्ताने बीकेसी मैदानावर झालेल्या अतिविराट सभेला त्यांनी संबोधित केले.

मुंबईच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण, ७ मलजल प्रक्रिया केंद्रांची उभारणी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नूतनीकरणाचा शुभारंभ याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

शहराची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी भांडुप येथील ३६० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, गोरेगाव येथील ३०६ खाटांचे रुग्णालय तसेच ओशिवरा येथील १५२ खाटांच्या प्रसूतीगृहाच्या पुनर्विकासाचा शुभारंभ देखील पंतप्रधान मोदी यांच्या शुभ हस्ते पार पडला.

याशिवाय मुंबई महानगरपालिका हद्दीतील २० नवीन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण देखील त्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

तसेच पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या माध्यमातून मुंबईतील सव्वा लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.

मुंबई शहराला एक सुंदर आणि सुनियोजित दर्जाचे आंतरराष्ट्रीय शहर बनवणे आणि त्याचे सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यासमयी पंतप्रधान मोदी यांनी दिले.

याप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय सुक्ष्म लघु आणि अवजड उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, विधानसभेचे अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, खासदार मनोज कोटक, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन, भारतीय जनता पक्षाचे मुंबई शहर अध्यक्ष आमदार आशिष शेलार तसेच बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लाखो कार्यकर्ते आणि मुंबईकर मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

वन्य प्राण्याच्या त्रासाने बळीराजा चिंतेत वनविभाग मात्र गाढ झोपेत

वनविभागाचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष एकुर्ली खैरगाव विहिरगाव धुमक चाचुरा परिसरात उभ्या पिकात रोहयाचा आणि रान …

व्हिडिओ गेम पार्लरची तपासणी करण्याकरीता संयुक्त पथक गठीत

तपासणी अहवाल 15 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved