Breaking News

367 लोकांना मिळाले मोफत विधी सहाय्य

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 19 : विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 मधील कलम 12 प्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच सर्व तालुका विधी सेवा प्राधिकरण सेवा समिती कार्यालयामार्फत महिला, बालक, न्यायालयीन बंदी, अनुसूचित जाती व जमाती मधील लोक, औद्योगिक कामगार, आर्थिक दुर्बल घटक यांना मोफत विधीसहाय्य दिले जाते.

सन 2022 मध्ये एकूण 367 लोकांना जिल्हा प्राधिकरण व तालुका समिती मार्फत मोफत विधी सहाय्य पुरविण्यात आले आहे. यात 167 महिला, 107 न्यायालयीन बंदी, 38 बालक, 5 अनुसूचित जाती जमाती मधील लोक, 1 औद्योगिक कामगार, 13 कोविड – 19 मधील व्यथीत तसेच 36 आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांचा समावेश आहे, अशी माहिती विधीसेवा प्राधिकरणचे सचिव न्या. सुमीत जोशी यांनी दिली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संत शिरोमणी रविदास महाराज समतावादी संत होते – प्राचार्य राहुल डोंगरे

शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा) – संत …

शिव मावळे ग्रुप तर्फे अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत “श्री छत्रपती शिवाजी महाराज” जयंती मोठ्या उत्साहात साजरी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी वार सोमवार शिव मावळे ग्रुप तर्फे अखंड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved