
विशेष प्रतिनिधी वर्धा
वर्धा:-भारत हा लोकशाही प्रधान देश असून या देशातील लोकशाही सुदृढ करण्यासाठी कोणत्याही अमिषाला बळी न पडता तसेच कुणाच्या दबावाला न जुमता आपले भविष्य उज्वल करण्यासाठी मतदान करून आमचा हक्क बजावणारच असे मत नवमतदारांनी व्यक्त केले.
मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन सप्ताह आयोजित करण्यात आला होता.
या निमित्ताने गो. से. वाणिज्य महाविद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.मी मतदान माजावरच कारण. या विषयावर तब्बल 24 विद्यार्थ्यांनी निंबधाच्या माध्यमातून आपले मत नोंदविले. या स्पर्धेचे परीक्षक डॉ आनंद इंगोले, डॉ. स्नेहलराज माकनवार, व प्रा सुरेखा दुबे यांनी केले. पायल चव्हाण, कोमल चाफले, तनुश्री तिमांडे याना प्रोत्साहन पर पारितोषिक जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते प्रधान करण्यात आले.