
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:- समोर असलेल्या होळी, धुलीवंदन सणा निमित्तानं आज दिनांक 04/03/2023 रोजी चिमूर पोलीस स्टेशन हद्दीत प्रोव्ही रेड बाबत पेट्रोलिंग करीत असतांना विश्वासू खबरी कडून मिळालेल्या माहिती नुसार मौजा पिपर्डा येथील जंगल परिसरातील गाव तलाव येथे धाड टाकून कार्यवाही केली असता 11 प्लास्टिक ड्रम मध्ये मोहासडवा 550 kg ज्यांची अंदाजे किंमत 82500/-रूपये असून दोन प्लास्टिक क्यान मध्ये 20 लिटर हातभट्टी मोहादारू किंमत 6000/-रूपये आणि 11 प्लास्टिक खाली ड्रम किंमत 3300/- रूपये व हातभट्टी मोहादारू काडण्याकरीता लागणारे इतर साहित्य किंमत 1200/- रूपये असा एकूण 93000/-रूपयाचा मुद्देमाल मिळाला असून आरोपी नामे नंदू मानकर रा. पिपर्डा हा फरार आहे.
तसेच वरील कार्यवाही करीत असता मुखबिर कडून माहिती मिळाली की मौजा पिपर्डा येथील जितेंद्र पोहनकर हा त्याचा शेता जवळ जंगलामध्ये हातभट्टी मोहा दारू काडण्याकरीता लागणारे साहित्य जमा करून ठेवले आहे.
अशा माहिती वरून त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता 12 प्लास्टिक ड्रम मध्ये हातभट्टी मोहा सळवा किंमत 90000/- रुपये,12 प्लास्टिक खाली ड्रम किंमत 6000/- रूपये ,02 लोखंडी शेगडी किंमत 1000/-रूपये व इतर साहित्य किंमत 1200/- रूपये असा एकूण 98200/- रूपये चा माल मिळून आला आरोपी नामे जितेंद्र पोहनकर पिपर्डा हा फरार आहे सादर दोन्ही कार्यवाहीत एकूण 191200/- रूपये चा मुद्देमाल मिळून आला असून सदर दोन्ही गुन्हा मधील फरार आरोपीचा शोध सुरू आहे, चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.