
पोलीस विभागावर शंका,गुन्हेगाराला अटक करावी
आकाश बांगडे यांची पत्रकार परिषदेतुन मागणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/नेरी:-नेरी येथील ग्रा प सदस्य असलेल्या संगीता यशवंत वैरागडे यांच्या घराचे बांधकाम सुरू असून रस्त्यावर व अंगणात सिमेंट पडते असे हटकले असता दि 2 फ्रेब्रू ला आरोपी यशवंत वैरागडे यांनी हातात कोयता घेऊन मुलगा आकाश बांगडे वडील हरींचंद बांगडे व आई यांच्यावर प्राणघातक हल्ला केला तसेच जीवानिशी मारण्याची धमकी दिली सदर प्रकरणी चिमूर पोलीस स्टेशन ला फिर्यादिनी तक्रार दाखल करण्यात आली तात्काळ चिमूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले मात्र तीन दिवस होऊनही प्राणघातक हल्ला करणारा आरोपी यशवंत वैरागडे हा मोकाट फिरत असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून माझ्या जीविताला धोका निर्माण झाला असून आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी आकाश बांगडे यांनी पत्रकार परिषदेतुन केली आहे.
सदर प्रकरणी आकाश बांगडे यांनी सांगितले मला संपविण्यासाठी वैरागडे कुटूंबियाचा पूर्व नियोजित कट असूनत्यानी मला मारण्याकरिता शंभर ते एकशे वीस कीमी दुरून पासुन सकाळीच नातेवाईकांना बोलविले व तद्नंतर स्वतःहून वाद वाढविला. यावरून मला कुटुंबसह संपविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. माझ्या सुजबुजतेने व दैव बलवत्तर म्हणून मी जीव वाचवू शकलो. यानंतर मी कुठे बाहेर फिरायला निघालो तर आरोपी हा पाठलागवर असतो आणि मला संपविण्याच्या भाषेचा वापर करत आहे. त्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला जीविताचा धोका निर्माण झाला तेव्हा त्या कोयता घेऊन हमला करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी अशी माझी मागणी असून आरोपी ला अटक न झाल्यास व मला व माझ्या कुटुंबाला आरोपिकडून काही झाल्यास याला सर्वंस्वी पोलीस प्रशासन जवाबदार राहील. असा इशारा पत्रकार परिषदेतुन आकाश बांगडे यांनी दिला आहे.
पोलीस स्टेशन चिमूर
दोन्ही पार्टीच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून, सूचना पत्र सुधा दिले आहे, सखोल चौकशी करून समोरील कार्यवाही करण्यात येईल.
मनोज गभने, पोलीस निरीक्षक चिमूर