
उपविभागीय अधिकारी चिमूर मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-दहावी, बारावी व ईतर वर्गातील मुलांची परीक्षा सुरू आहे. तर ईतर वर्गाची येत्या समोरील महिन्यात सुरू होणार आहे. आणि यां सथास्थितीत सर्व विभागीय कर्मचाऱ्यानी बेमुदत संप पुकारून “जुनी पेंशन” लागू करण्या संदर्भात संप पुकारलेला आहे. त्यामुळे शेतक-यांचे तसेच विद्यार्थ्यांचे शासकीय व शैक्षणिक नुकसान होत आहे.
सदर विभागीय कर्मचारी तात्काळ आपल्या सेवेत रुजू न झाल्यास त्यांना पदावरून निलंबीत करण्यात यावे. तसेच त्यांच्या ठिकाणी नविन पदभरती करण्यात यावी. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. विभागीय कर्मचारी बेमुदत संप पुकारून “जुनी पेंशन” लागू करण्या संदर्भात संप पुकारलेला आहे. त्यामुळे शेतक-यांचे तसेच विदयार्थ्यांचे शासकीय / शैक्षणिक नुकसान होत आहे. सदर विभागीय कर्मचारी रुजू न झाल्यास त्यांना पदावरून निलंबीत करण्यात यावे. तसेच नविन पदभरती करण्यात यावी. अशी मागणी समाजिक कार्यकर्ते देविदास जांभुळे यांनी उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
सुशिक्षित बेरोजगार तथा शेतकरी यांनी संप पुकारलेल्या शिक्षक तथा सर्व कर्मचारी यांच्या विरोधात
समाजिक कार्यकर्ते देविदास जांभुळे यांच्या मार्गदर्शांत व राकेश शेरकी यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी देविदास जांभुळे, राकेश शेरकी, गोपीचंद शेंद्रे, सुनील भरडे, रवींद्र चौधरी, गणेश रंदये, गुलाब रंदये आदी सुशिक्षित बेरोजगार युवक व शेतकरी बांधव उपस्थीत होते.