Breaking News

वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना ५ लाख रूपयांची तात्‍काळ मदत

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते धनादेश प्रदान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर,दि.७ : चंद्रपूरच्‍या इंदिरानगर येथील रहिवासी पुरूषोत्‍तम बोपचे (४० वर्ष) हे फुले वेचण्‍यासाठी वनामध्‍ये गेले असता वाघाने त्‍यांच्‍यावर जबरी हमला केला व त्‍यात त्‍यांचा जागीच मृत्‍यु झाला.

या दुर्देवी घटनेनंतर महाराष्‍ट्राचे वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोपचे यांच्‍या परिवाराला शासन नियमानुसार मदत करण्‍याचे निर्देश दिले. त्‍यानुसार वनविभागाने बोपचे यांच्‍या कुटूंबास ५ लाख रूपयांचा धनादेश ना. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते प्रदान केला.

यावेळी देवराव भोंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. कारेकर, माजी उपमहापौर राहूल पावडे, माजी नगरसेविका चंद्रकला सोयाम, दिनकर सोमलकर, डॉ. गिरीधर येडे, मनोज पोतराजे, पप्‍पु बोपचे, प्रलय सरकार, आशिष ताजने व त्‍या प्रभागातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यापुढील मदतीची रक्‍कम या कुटूंबाला लवकरात लवकर देण्‍याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी यावेळी अधिका-यांना दिले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved