Breaking News

व्हाईस ऑफ मिडिया डिजिटल विंग चंद्रपूर जिल्हा बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:- व्हाईस ऑफ मिडया डिजिटल विंग चंद्रपूर जिल्हा बैठक दि. ०७ मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह चंद्रपूर येथे संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्हाईस ऑफ मीडिया नागपूर विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक होते. यावेळी व्हाईस ऑफ मिडया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विंग जिल्हाध्यक्ष विजय सिद्धावार, जिल्हा कार्याध्यक्ष गुरु गुरनुले, महानगर कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया मंचावर उपस्थित होते.

व्हाईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी मार्गदर्शन करताना व्हाईस ऑफ मीडिया संघटनेबद्दल माहिती दिली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश खाटीक यांनी व्हाईस ऑफ मिडिया संघटनेचे कार्यपध्दती, काम आणि महत्व यांच्यावर प्रकाश टाकले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हाईस ऑफ मिडिया डिजिटल विंग जिल्हाध्यक्ष विजय सिद्धावार, सुत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस भैरव दिवसे तर आभार जिल्हा उपाध्यक्ष मनोज पोतराजे यांनी केले.यावेळी संजय कन्नावार, राजू बिट्टुरवार, अनुप यादव, श्रीहरी सातपुते, नेहा मानकर, कुमुदिनी भोयर, शब्बीर नुरुद्दिन सय्यद, शंकर महाकाली, मुबारक शेख, अमित राऊत, मनिष तावडे आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : …

नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved