
प्रतिनिधी – नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी प्र:-वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आठवा मैल येथील डॉक्टर राठी चा क्लिनिक सामोरं अमरावती रोड ओलांडत असताना भरधाव ट्रक क्र. बी . बी . 7933 ने धडक दिल्या मुळे, युवकाचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेने परीसरात हळ हळ व्यक्त केली जात आहे. मृतक रामेश्वर रघुनाथ लोणारे (३६) रा. रामजी आंबेडकर नगर रविवार च्या रात्री १०:३० च्या सुमारास रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक ने धडक दिल्यामुळे युवकाचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्ष दर्शी नागरिकांनी सांगितल्या प्रमाणे ट्रक खाली डोके चिरडून अस्तव्यस्त पडले होते. फक्त धड शिल्लक राहिल्याचे चित्र होते.
मृतक रामेश्वर रघुनाथ लोणारे यांचा मागे पत्नी व १२ व ७ वर्षाचा दोन मुली आहेत. वाडी पोलीस लगेच घटना स्थळी पोहचून पंचनामा केला उतरीय तपासनी साठी मृत देह शासकीय रुग्णालय नागपूर ला पाठवले. आरोपी ट्रक चालकाविरुद्ध कलम 279.304 अ ) भादवी सहकलम 134.177 मो वा का कायद्यान्वये गुन्हा दाखल करूण आरोपी अजहर बेग गुलाम बेग वय २५ रा. गुरुवाडा प्लॉट वाशिम रोड अकोला यास ताब्यात घेतले आहे . पुढील तपास वाडी पोलीस करीत आहेत.