
निःशुल्क सेवेची समाजाने दखल घ्यावी!-वसंतराव इखनकर
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी(प्र):-आज सर्वत्र स्पर्धा, महंगाई ,समाजसेवेची कमी झालेली ओढ लक्षात घेता टूगेदर व्ही फाईट फाउंडेशन राबवित असलेले निःशुल्क प्रशिक्षण व उपक्रम निश्चितच आदर्श व प्रशन्सनीय असून समाजाने या अतुलनीय कार्याची दखल घ्यावी असे महत्वपूर्ण प्रतिपादन स्थानिक उद्योजक व वाडी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष वसंतराव इखनकर यांनी सदर संस्थेच्या नवनिर्मित कार्यालय उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.
सदर संस्थेच्या नूतन स्थलांतरित कार्यलयाचे फित कापून व डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,तथागत बुद्ध यांच्या छायाचित्राला वसंतराव इखनकर, माजी जि प सदस्य सुजित नितनवरे,शिक्षणतज्ञ प्रा.सुभाष खाकसे ,परमात्मा सेवक गिरीधर बरगे, राष्ट्रवादी उद्योग आघाडी चे मोहन ठाकरे, साईरा अकॅडमी राजकुमार सर, टूगेदर व्ही फाईट फाउंडेशन चे संस्थापक प्रमुख राजकुमार वानखेडे यांच्या हस्ते व उपस्थितीत सम्पन्न झाले.
संस्थे तर्फे मंचकावर उपस्थित सर्व अतिथींचे स्नेहील स्वागत करण्यात आले.प्रस्तावनेत राजकुमार वानखेडे यांनी संस्था गत 2 वर्षांपासून गरीब व गरजू महिला,विद्यार्थिनींना निःशुल्क संगणक ,ब्युटी पार्लर,शिवणकाम इ.चे प्रशिक्षण देत आहे असे सांगितले.प्रा.सुभाष खाकसे यांनी ग्रामीण भागातील गरजूना या कार्याचा लाभ होईल.समाजाने अशा कार्य करणाऱ्या संस्थेला मदत करण्याचे आवाहन केले.सुजित निंतनवरे,मोहन ठाकरे,गिरीधर बरगे, साईरा अकॅडमी राजकुमार सर यांनी ही समयोचित विचार व्यक्त केले. मैथिली सोनवणे या विद्यार्थिनीने देखील मनोगत व्यक्त केले.या कार्यलायाचे सामाजिक दृष्टिकोनातून निःशुल्क बांधकाम करून देणारे सुनील कुर्वे गीता कुर्वे या पती-पत्नीचा अतिथींच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन अश्विनी मेश्राम, तर आभार नंदकुमार सोनुले यांनी केले.कार्यक्रमला यशस्वी करण्यासाठी टूगेदर व्ही फाईट फाउंडेशन चे पदाधिकारी सुभाष जोशी, करुणा गवडे,दादाराव इंगळे, सुलोचना इंगळे, ज्योती सोमकुवर, मंदा गणवीर, सपना लाल, सोनाली बनसोड, कविता नगराळे संतोष साउथकर शिवा गरुड देविदास देशमुख दीपक कोरे, दामिनी नेवारे, स्मिता जोशी, समीक्षा नवारे, मंगेश गवळे, शारदा कोरे, सपना जोशी, शिवप्रसाद बांगरे,उपस्थित होते.