Breaking News

एस. आर. व्ही. नर्सिंग नागभीड येथे “जागतिक परिचारिका दिन साजरा”

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

नागभीड:-नागभीड येथिल एस. आर. व्ही. नर्सिंग स्कुल अँड रिसर्च इंस्टिटयूट (जी.एन.एम. व ए.एन. एम. ) नागभीड जि. चंद्रपुर येथे १२ मे रोजी फ्लॉरेंस नाइटिंगेल यांचा जन्म दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात “आधुनिक नर्सिंग ची जननी फ्लारेंस नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे व्दिप प्रज्वलन करून करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन बनकर, प्रमुख पाहुणे रोशन बावनकर तसेच मार्गदर्शक म्हणून प्रा. नेहा शिंदे उपस्थित होत्या. मान्यवरांनी फ्लारेंस नाइटिंगेल यांच्या विषयी विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्याच्या वाटचालीकरीता शुभेच्या दिल्या.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन जी. एन. एम. व्दितीय वर्षांची विद्यार्थ्यांनी कु. नोवाली नागापूरे हिने केले तर आभार ए. एन. एम. प्रथम वर्षाची विद्यार्थ्यांनी कु. विशाखा काटलाम हिन मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी. एन. एम. नर्सिंग व ए.एन.एम. नर्सिंग च्या विद्यार्थ्यांनी तसेचे सुनिल बोरकर यांनी मोलाचे सहकार्य केल व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved