
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
ब्रह्मपुरी:-ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत माहेर खरबी तुमडी मेंढा ही गावे यापूर्वी खेड मक्ता साजात होती ब्रह्मपुरी तहसीलदार यांच्या साजा पुनर्रचना आदेशाने मौजा माहेर खरबी तुमडी मेंढा या गावांचा खेड मक्ता साज्यातून नाव कमी करून देलनवाडी साजामधे समावेश करण्यात आला गावातील अनेक नागरिकांच्या शेतजमिनी खेड मक्ता साध्या येत असल्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळे ठिकाणाहून सातबारा काढणे हे शारीरिक व मानसिक त्रासाचे होणार आहे.
त्यामुळे माहेर खरबी तुंबडी मेंढा ही गावे पूर्वीच्या खेड मतदार तलाठी साजामधे समाविष्ट करण्यात यावे गावकऱ्यांना होणारा त्रास कमी होण्यास मदत मिळेल खेड मतदार वरील तिन्ही गावे समाविष्ट न झाल्यास शिवसेना व गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा प्रस्तुत निवेदनातून देण्यात आला तालुक्यातील ग्रामपंचायती माहेर खरबी तुमडी मेंढा या गावांना देलनवाडी साध्यातून वगळून पुनश्च खेळ साज्यामध्ये समाविष्ट करण्यात यावे या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्राध्यापक अमृत नखाते चिमूर विधानसभा क्षेत्र यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे महसूल मंत्री त्याचप्रमाणे पालकमंत्री चंद्रपूर तसेच विभागीय आयुक्त नागपूर यांना माननीय तहसीलदार साहेब ब्रह्मपुरी यांच्यामार्फत देण्यात आले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केवळ राम पारधी उपतालुकाप्रमुख ब्रह्मपुरी तथा सरपंच शामराव भानारकर माजी शहर प्रमुख ब्रह्मपुरी गुलाब बागडे विभाग प्रमुख खेळ मत्ता मोतीराम अमृतकर राजनंदिनी मेश्राम तुमडी मेंढा विद्या मेश्राम मेघा सोरटे गणेश बागडे शाखाप्रमुख बाहेर हिरामण वनिता कोलते महाजन महादेव शुल्काबाई मेश्राम नीता बोरघरे ज्योती गेटकर देवेंद्र पुनम अमृतकर बुधाजी अमृतकर नयना कराटे गोपीचंद मेश्राम विश्राम लक्ष्मी अमृतकर सुनंदा ठवरे सुधाकर बनकर मोहनदास राकडे केवळ राम चहांदे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.