
19 मे रोजी कांग्रेस पक्ष काढणार मोर्चा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-शुक्रवार दिनांक 12 मे रोजच्या आठवडी बाजारात नगर परिषदच्या कर्मचारी यांनी शेतकरी व भाजीपाला विक्रेत्यांचा माल फेकून नुकसान केले, या घटनेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ सतीश वारजूकर यांनी नगर परिषद प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करून या मुख्याधिकारी यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली.
चिमूर येथील मेन रोडवर भरणारा आठवडी बाजार लोणकर यांचे पेट्रोल पंपचे मागे भरविण्यात यावा, असा असा तगादा गेल्या तीन आठवड्यापासून चिमूर नगर परिषद प्रशासन दुकानदारांना लावत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यात येईल, व त्यानंतर दिनांक 19 मे रोजी चिमूर नगर परिषद कार्यालयावर भाजीपाला विक्रेते, शेतकरी व किरकोळ दुकानदार यांना सोबत घेऊन मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती डॉ. वारजूकर यांनी दिली.पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर यांचे सोबत चिमूर शहर कांग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे, माजी नगर सेवक नितीन कटारे, प्रा. राजु दांडेकर, पप्पूभाई शेख, प्रशांत डवले, घनश्याम रामटेके, राकेश साठोणे यांचेसह बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.