
आनंदवान चौक इथून बाईक रॅली बाईक रॅली
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा:-पुणश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर उत्सव समिती वरोरा द्वारा आयोजित राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९८ वी जयंती उत्सव चा कार्यक्रम दिनांक ३१ मे २०२३ बुधवार ला सकाळी ७ वाजता आनंदवन चौक ते गांधी चौक ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रम पर्यंत बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. रॅली नंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रम बोर्ड येथे जयंती उत्सवाचा कार्यक्रम चे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नायब तहसीलदार मधुकर काळे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोकराव वैद्य तर प्रमुख पाहुणे म्हणून धनगर अधिकारी कर्मचारी संघाचे अँड अनिल कुमार ढोले, विदर्भ महासचिव रासपा संजय कन्नावार, सामाजिक कार्यकर्ते स्वाती खराबे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वृद्धाश्रम संचालिका सोनूताई येवले, उपजिल्हा रुग्णालय आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल खुजे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. या बाईक रॅली व जयंती कार्यक्रमासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पुण्यशोल्क राजमाता अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती वरोरा च्या वतीने करण्यात येत आहे.