
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-चिमूर तालुक्यातील स्मारक समिती चौरस्ता आंबोली हे ठिकान वंदनीय राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज यांच्या पदस्पर्शा पावन झालेली भूमी असून या ठीकाणी दरवर्षी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे दर्शन घेण्याकरीता येत असतात परिसरात दोन वर्षापासुन अवैध दरुविक्री सुरू आहे चौरस्ता (आंबोली) हे ठिकान भिसी पोलिस स्टेशन च्या हद्दीमधे येत असुन ग्राम पंचायत आंबोली ने व स्मारक समीतीने अनेकदा पोलिस स्टेशन भीसी येथे पत्रव्यवहार व निवेदन दिले असता व अनेकदा आंबोली गावातील महिला मंडळांनी आंबोली ग्राम पंचायत च्या सहकार्याने पोलिस स्टेशन भिसी येथे घेरावही घातला होता व पोलिस स्टेशन भिसी चे पोलिस निरीक्षक राऊत व उपनिरीक्षक जंगम यांना वेळोवेळी माहिती व निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही झालेली नसून खुलेआम अवैध दारुविक्री चालू आहे.
तरी तत्काळ अवैध दारुविक्री बंद करावी अशी मागनी आंबोली ग्राम पंचायत सदस्य व वंचित बहुजन युवा आघाड़ीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष शुभम मंडपे यांनी केली आहे स्मारक समिति चौरस्ता येथिल 15 दिवसात दारुविक्री बंद न केल्यास चौरस्ता (आंबोली) येथे आंबोली ग्राम पंचायत च्या वतीने व आंबोली, चिचाळा(शास्त्री), लावारी, गडपिपरी, पुयारदंड, बोरगांव गावकरी मंडळी च्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा ईशारा आंबोली ग्राम पंचायत सदस्य शुभम मंडपे यांनी दिला आहे,
ज्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे चिमुरच्या क्रातीभूमित स्वातंत्र्य काळात मोलाचे योगदान आहे व “पत्थर सारे बाम बनेंगे, भक्त बनेगी सेना , झाड झडूले शस्त्र बनेंगे ,नाव लगेगी किनारे” या क्रांतिकारी भजनाने प्रेरित होऊंन चिमुर हे देशामध्ये प्रथम स्वंतंत्र झाले होते
म्हणुनच स्मारक समिति चौरस्ता (आंबोली) येथील अवैध दारुविक्री तत्काळ बंद करावी