Breaking News

स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेना पदाधिकारी यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे

शिवसेना-युवासेना तर्फे नागभीड पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

नागभीड:-चंद्रपुर जिल्ह्यातील नाडभीड पोलीस स्टेशन येथे शिवसेना व युवासेना तर्फे निवेदन देण्यात आले.

दिनांक 13 जून 2023 रोज मंगळवारला चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे आणि मनिषभाऊ जेठांनी युवा सेना जिल्हाप्रमुख तसेच शिवसेना पदाधिकारी तथा स्थानिक माता-भगिनी यांच्यावर कुठल्याही प्रकारची अनुसूचित घटना घडलेली नसतांना सुध्दा माजरी पोलीस अधिकारी यांनी खोटे गुन्हे दाखल केले असून सदर गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे या याकरिता शिवसेना युवासेना तर्फे नागभीड पोलीस स्टेशन येथे शिवसेना युवासेना पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखालील निवेदन सादर केले.

यावेळी निवेदन देताना युवासेना उपजिल्हाप्रमुख नाजीम शेख, शिवसेना तालुका संघटक विकी मडकाम, युवासेना तालुकाप्रमुख अमोल मांढरे, शिवसेना शहरप्रमुख अमित अमृतकर, युवासेना शाखाप्रमुख अंकुश मांढरे, मंगेश मांढरे, बालू मेश्राम, मयूर जिवतोडे, प्रकाश नाणे समस्त शिवसेना युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शिष्यवृत्ती परिक्षेत वेदांती गभणे विद्यार्थिनीचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित प्राथमिक स्तरातुन फेब्रुवारी …

जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा

तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved