
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुक्यातील तालुका कृषी कार्यालया मार्फत तालुक्यात सरकारचा योजनेचेतील शेततळे वं जलसंधारणाचे कामे शेतकरी लाभार्थीच्या शेतात करण्यात आली आहे. यात कोटी रुपयांचा भष्ट्राचार झाला आहे अनेक शेतकर्याच्या तक्रारीच्या अनुसंधाने शुक्रवारला विविध प्रश्नांची जाब विचारण्यासाठी चिमूर तालुका कॉंग्रेस कमिटीने तालुका कृषी कार्यालय गाठले असता. तालुका कृषी अधिकाऱ्यांसोबत दोन तास चर्चा करून सुद्धा – मात्र काही प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने चर्चा झाली नाही.
मात्र अनेक बोगस आकडे दाखवून शेतकऱ्याची फसवणुक केल्याचे आढळून आले, तालुक्यात एकूण ३३ हजार ३१७ शेतकरी आहेत यापैकी १३०२२ शेतकऱ्यांनी अँग्रो कंपनीकडून विमा काढला. यादीत ३४७ शेतकर्याची नावे आली मात्र प्रत्यक्ष २७० शेतकऱ्यांनाच लाभ मिळाला या साठी शेतकर्याना मार्गदर्शन करण्यात तालुका कृषी विभाग अयशस्वी ठरले आहे. गेली दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील नुकसानग्रस्तांना गावा गावांमध्ये कमीशनर कलेक्टर आणि आमदार बंटी भागडिया यांनी भेट देवुन शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून सुद्धा अजून पर्यत्त कुठल्याही प्रकारची मदतीची घोषणा केली नाही.
तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील लाभार्थ्यांना रक्कम सहा महिण्यापासून मिळाली नसल्याचा आरोप कॉंग्रेस चिमूर विधानसभा समन्वयक डॉ. सतिश वारजुकर यांनी चिमूर येथील कॉंग्रेस कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. हा सर्व प्रकार स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे होत असल्याचे म्हटले आहे पत्रकार परिषदेत तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावडे, शहरअध्यक्ष अविनाश अगडे, विजय डाबरे, रोशन ठोक, नागद्रे चट्टे ,पप्पू शेख, महिला अध्यक्ष वनिता मगरे ,राणी भुटे, संगीता चौधरी यावेळी कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.