Breaking News

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव यामधे सतत दुसऱ्या वर्षी दिला हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी ने सहभाग

लोकमान्य हायस्कूल मध्ये घेतली तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

भद्रावती:-आज दिनांक 13/08/2023 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहे.मागच्या कोरोना काळामध्ये मुलांना अभ्यासक्रमाकडे असलेला गोडवा कमी झाला हे सध्या दिसून येत आहे आणि मोबाईल मध्ये वेळ घालवण्यात मुलं खुश होते या सर्व गोष्टीवर आळा म्हणजे मुलांना पुस्तकाबद्दलची किंवा अभ्यासक्रमाबद्दल चे महत्त्व आणि वाचनाचा गोडवा वाढावा या दृष्टिकोनातून हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी या संस्थेने तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा या परीक्षेचे सतत दुसरे वर्ष 13/08/2023 ला आयोजन केले .सदर स्पर्धेला उत्कृष्ट सहभाग लाभला. परिक्षा चार गटात घेण्यात आली.गट ‘अ’ मध्ये इयत्ता 5 ते 7 , गट ‘ब’ 8 ते 10, गट ‘क’ 11-12 आणि गट ‘ड’ खुला अश्या प्रकारचे विद्यार्थी होते.1000 च्या वर स्पर्धकांनी सहभाग दिला.

विशेष म्हणजे या स्पर्धेला लोकमान्य हायस्कूल चे मुख्याध्यापक सरपटवार सर, पालकांनी व शिक्षक वृंद यांनी स्वतः मुलांना परीक्षेला पाठविण्यास प्रेरित केले. सदर परीक्षा सकाळी 10 ते 11 या वेळला झाली.यामध्ये हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटीचे सर्व संस्था अजय मुसळे, सोनल उमाटे, रिता सहारे, स्नेहा दारूंडे, कृतांत सहारे, अंकित तोडे, प्रशांत सातपुते, अब्दुल शेख, मनोज पेटकर, तुषार दुर्गे, दीपक कावटे, राकेश चटपल्लिवार, रोहिणी पडवेकर, रतन पेटकर, सागर निरंजने, स्वप्निल मत्ते, निखिल उंबरकर, श्वेता उंबरकर,हर्षदा हिरादेवे,प्रज्ञा गायकवाड,नितेश बानोत,अतुल खापने, आशिष मल्लेलवार, विक्रांत बिसेन, चैताली डारूंडे, शुभम पिंपळकर, मंथन राजूरकर, सुजाता कवाडे, चैताली दारुंडे, शालिनी रायपुरे, क्रिश भोसकर, रजनी रामटेके, अनिकेत रायपुरे, निलेश पिंपळकर, अभिनव पाझारे, प्रशिक लोणारे,दक्षिणा हुमणे, किरण तामगाडगे, स्नेहल सुखदेवे, देवयानी वासेकर, अश्रिनव माथनकर, आझाद खुडसंगे, अभिषा रंगारी, स्नेहा भगत,प्रज्ञा खोब्रागडे व सर्व संस्था सदस्य उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved