Breaking News

पोषण आहार सप्ताह मध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा:-उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पोषण आहार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या ७ दिवसांमध्ये पोषण आहार विषयी वेगवेगळ्या पाककृती स्पर्धा, आरोग्य शिक्षण स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, कविता स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, इत्यादी पोषण आहार विषयांवर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.तर पुर्ण सप्ताहात बचतगट आरोग्य सेविका,आशावर्कर, वेगवेगळ्या संस्था, संघटना यांना सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सौ. वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा या नं ९९२२०१३२४३ संपर्क करावा.या कार्यक्रमात डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक जनरल सर्जन,सौ. वंदना विनोद बरडे अधीसेविका,सौ‌ गीतांजली ढोक आहारतज्ज्ञ,सौ वंदना बुर्रेवार समुपदेशक,यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.तरी जास्तीत जास्त महिलांनी यांत सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजिका सौ. वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार …

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved