
3 ते 6 ऑक्टोबर कालावधीत होईल कामकाज
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:शासनाने दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी ईद-ए-मिलाद सणाकरीता सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे 29 सप्टेंबर रोजी योग्यता प्रमाणपत्राकरीता घेण्यात आलेल्या ऑनलाईन अपॉइंटमेंटच्या वेळेत बदल करण्यात आले असून दि. 3 ते 6 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दि. 29 सप्टेंबर रोजी अपॉइंटमेंट घेण्यात आलेल्या वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज करण्यात येईल, याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.