Breaking News

तुमसर येथे सावित्री – जिजाऊ जन्मोत्सव संपन्न

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)-दिनांक 7जानेवारी 2024 ला रविवार रोजी जिजाऊ ब्रिगेड तुमसर व भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने शामसुंदर सेलिब्रेशन हॉल तुमसर येथे जिजाऊ सावित्री जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
आज बेरोजगारी,व्यसनाधीनता, वैफल्यता आणि त्यातून होणारी आत्महत्या, स्त्रीवरील पाशवी अत्याचार असे सामाजिक प्रश्न समाजापुढे उभे आहेत. यावर उपाय म्हणून महामानवांची व महानायकांची विचारधारा ही काळाची गरज झालेली आहे.

प्रेरणादायी विकासाच्या दिशा म्हणून महानायिकांचे कार्य अजरामर आहे.ते जनमानसात रुजले जावे यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनीं यांच्याकरिता प्रबोधन,रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विद्यार्थ्यांसाठी लेफ्टनंट चषक आकारसिंग पटले यांच्याकडून रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटिका म्हणून कीर्तीताई गणवीर पंचायत समिती सदस्य भंडारा,अध्यक्ष व मार्गदर्शक म्हणून प्रियाताई शहारे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती भंडारा तर प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणीताई भुरे अध्यक्ष उडान फाउंडेशन तुमसर, कुसुमताई कांबळे माजी सभापती पंचायत समिती तुमसर, प्रीतीताई पडोळे संचालिका व मुख्याध्यापिका पंडित दीनदयाल उपाध्याय हायस्कूल डोंगरला, निरुपमाताई भोयर संचालिका भोयर बायोलॉजी ट्युशन क्लासेस तुमसर,प्रतिभाताई लांडगे जिल्हा अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड भंडारा हे होते.मासाहेब जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. शिवमती हिराताई बोंद्रे तालुकाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड तुमसर यांनी प्रास्ताविकेमधून जिजाऊ ब्रिगेडची भूमिका व कार्याची मांडणी केली.

कार्यक्रमाचे संचालन शिवमती शितलताई भुसारी यांनी केले तर आभार शिवमती प्रतिभाताई लांडगे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवमती नीतू वर्षाताई घटारे, शिवमती सुलभाताई हटवार, शिवमती प्रीतीताई भोयर, शिवमती अंजलीताई लांजेवार, शिवमती कल्पनाताई चामट, शिवमती रत्नमालताई मने, शिवमती रुपालीताई खराबे, शिवमती बालिताई सार्वे तसेच म. से. सं चे तालुकाध्यक्ष शिवश्री चंद्रकांत लांजेवार,म . से. सं चे मार्गदर्शक व माजी जिल्हाध्यक्ष शिवश्री अनिल भुसारी, शारदा विद्यालय तुमसर चे मुख्याध्यापक शिवश्री राहुल डोंगरे सर, म.से स चे सचिव शिवश्री मने सर, ज्येष्ठ मार्गदर्शक शिवश्री राजूभाऊ चामट, म. से. स. चे सदस्य शिवश्री संजू दादा सार्वे यांनी सक्रिय सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved