Breaking News

मुख्यमंत्र्यांनी बोलावली बारा बलुतेदार ओबीसी समाजाची बैठक

आज सह्याद्री अतिथी ग्रहावर ही बैठक पार पडली

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: बैठक मराठा समाजाला ओबीसित घ्या आमची काहीच हरकत नाही. परंतु 19% ओबीसी आरक्षण मधून 5% वेगळे आरक्षण बारा बलुतेदार समाजाला देण्याची मागणी या नेत्यांनी केली. आजपर्यंत ओबीसी आरक्षण मध्ये काही मोजक्याच जातींनी आरक्षण हडप केले. आम्ही मूळ ओबीसी आहोत. आम्हाला आमच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या. यापूर्वी सरकार ने भटक्या विमुक्त जातींना वेगळे उपवर्ग करून आरक्षण दिले आहे. आता आम्हालाही वेगळे काढून द्या. आम्ही मराठा समजासोबत सुरुवातीपासून आहोत. पुढेही राहू. असा शब्द या बारा बलुतेदार समाजातील नेते बालाजी शिंदे यांनी दिला.

राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा अशी उभी फूट पडली असताना ही बैठक अत्यंत महत्वाची ठरणार आहे. ओबीसी आरक्षण मध्ये पुन्हा विभागणी करण्याकडे छगन भुजबळ कसे व्यक्त होतात हे पाहणे औ्सुक्याचे ठरेल.

*आज इतिहासात पहिल्यांदा बारा बलुतेदार समाजाची अधिकृत बैठक या मुख्यमंत्र्यांनी घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे कायम आभारी राहू. मराठा आंदोलनाचे नेते योगेश केदार यांनी आमची ही बैठक घडवून आणली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. असे नाभिक समाजाचे नेते सोमनाथ काशीद यांनी सांगितले.*

ओबीसी आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून स्वतंत्र ५% आरक्षणाच्या मागणीसह राष्ट्रसंत गाडगेबाबा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी वंचित ओबीसी बलुतेदारांच्या शिस्टमंडळाची मा. मुख्यमंत्री महोदयांसह बैठक

विविध मागण्या पुढील प्रमाणे:-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी विश्वकर्मा योजना सुरूकेली, त्याचाच आधार घेऊन सारथीव महाज्योतीच्या धर्तीवर विश्वकर्मा कौशल्पविकास मार्फत बलुतेदारांना प्रशिक्षण व प्रमाणपत्र द्यावे

असंघठीत बलुतेदार कामगारांना स्वंयघोषना पत्रावर असंघठीत कामगारांचे लाभ द्यावेत

शूरवीर जिवाजी महाले यांचे प्रतापगडावर स्मारक उभारावे

श्री संत गाडगेबाबा कर्मभूमी स्मारक समिती क्षेत्र ऋणमोचण जि अमरावती (रजि) येथे येथे गाडगे बाबांच्या राष्ट्रीय स्मारकाला भरिव निधी देण्यात यवा

तेर जि उस्मानाबाद येथे श्री संत गोरोबाकाका तीर्थ क्षेत्राला अदर्जा देण्यात यावा

पारंपरिक कुंभार उदयोगाला मातीकामात रॉयल्टी माफ करावी

कोविड 2019 काळात आत्महत्या ग्रस्त सलून उद्योजकांचे पुनर्वसन करावे इ मागण्याचे निवेदन देण्यात आले मुख्यमंत्र्यांनी बारा बलुतेदारांचे सर्वप्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved