Breaking News

अध्यापक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

जिल्हा प्रतिनिधी/ जयेंद्र चव्हान
मो.9665175674

(भंडारा)- महिला शिक्षण प्रसारक मंडळ भंडारा व्दारा संचालित महिला अध्यापक विद्यालय येथील लीलाताई गुप्ते सभागृहात दोन दिवसीय स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला.स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेच्या संस्थापक तथा माजी प्राचार्य शुभांगी ऋषि यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोषाध्यक्ष युगकांता रहांगडाले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक नानासाहेब वझलवार, रामदास शहारे, प्राचार्य धनराज बारस्कर, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, प्राचार्य जयाप्रभा मारबते, विद्यार्थींनी प्रतिनिधी शेजल सिंगनजुडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सरस्वती मातेच्या प्रतिमेला मार्ल्यापण व दिप प्रज्वलित करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी स्नेहसंमेलन व महिला शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशोगाथावर विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.

ह्याप्रसंगी महिला अध्यापक विद्यालयातील छात्रध्यापक विद्यार्थींनींनी माय भिमान, माय बापाने, आमर पारा तुमर पारा अशा विविध गाण्यांच्या तालावर अख्खं रसिकांचे मने जिंकली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिष्मा देशमुख व शेजल सिंगनजुडे यांनी केले. प्रास्ताविक अध्यापक विनोद चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार पूजा चोपकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यापक गणेश किरसान, वर्षा चांदेकर, आंभोरकर, मनोज टेकाम, निलिमा काळे, प्राजक्ता निर्वाण, नितिशा निर्वाण, अश्विनी हुकरे, अर्चना नेवारे, गायत्री जुगनायके, पूजा खंडाते, खुशबु धुर्वे, दिव्या कटरे, सुहानी फुलबांधे, भाग्यश्री चामलाटे, यामिनी निमकर, कविता चव्हान इत्यादी विद्यार्थींनी तसेच कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा …

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved