Breaking News

२ लाख ३७ हजार रुपयाचा सुगंधीत माल जप्त

LCB व चिमूर पोलीसांची संयुक्त कारवाई

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:- किराणा दुकानदार सुगंधीत तंबाकू विकत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली त्यानुसार छापाकार कारवाई करून २ लाख ३७ हजार ६४५ रुपयांचा सुंगधीत तंबाकू जप्त करण्यात आला. आरोपीचे नाव जगदीश काशीनाथ आष्टणकर नेरी येथील रहीवासी आहे. ही छापामार कारवाई बुधवार ला सकाळी पहाटे पाच वाजता शेतातील चांदेकर यांच्या गोडावूनमध्ये करण्यात आली. पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.

चंद्रपूर LCB चे किशोर शेरकी व पथक व चिमूर पोलिसांना नेरी येथे सुगंधीत तंबाकू विकत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार जगदीश आष्टणकर यांना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता नागभीड येथील आदील कुरेशी हा सुंगधीत तंबाकू पुरवठा करत असल्याची माहिती दिली.

पोलीसांनी जगदीश याला विचारपूस केली असता नेरी पासुन तिन किमी अंतरावरील शेतात गोडावून आहे त्या गोडावून मधून माल आणून विकतो असे बोलले असता गोडावून मध्ये तपासणीसाठी गेले असता सुगंधीत तंबाकू इगल, मजाचे बाक्स आढळून आले असता २ लाख ३७ हजार ६४५ रुपयांचा माल जप्त केला. यापैकी आदिल कुरेशी फरार असल्याची माहिती आहे. पुढील तपास पिएसआय दिप्ती मरकाम करित आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved