Breaking News

प्रत्येक नागरिकांनी पाण्याचे संरक्षण करावे – समन्वयक अविल बोरकर-जलजागृती सप्ताहाला प्रारंभ

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674

(भंडारा दि.१४) – तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचा वापर काटकसरीने करून शेती करावी. पाण्याचे नियोजन करतांना नागरिक व कर्मचाऱ्यांनी आपली योग्य भूमिका पाळली तर पाण्याची समस्या सुटेल तसेच पाणी प्रदूषण होणार नाही याची प्रत्येक नागरिक व कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी. कारण मानव हा पाण्याची निर्मिती करू शकत नाही मात्र पाण्याचे संरक्षण करू शकतो व त्याचे योग्य वापर केल्यास जल सप्ताह यशस्वी होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन विदर्भ समितीचे सदस्य तथा चला जाणूया नदीला समन्वयक अविल बोरकर यांनी केले.ते जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित जलजागृती सप्ताहा निमित्त मार्गदर्शन करतांना बोलत होते.

 

जलपूजन, जलप्रतिज्ञा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोसीखुर्द उपसा सचिंन विभाग आंबाडीचे अधिक्षक अभियंता तथा जलजागृती सप्ताह उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष सं. फे. विश्वकर्मा होते.उद्घाटन विदर्भ समितीचे सदस्य तथा चला जाणूया नदीला समन्वयक अविल बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कापगते, कार्यकारी अभियंता दमाहे, वाही डावा कालवा विभागाचे मोरे, पाटबंधारे अन्वेषण विभागानचे कार्यकारी अभियंता बानुबाकडे, उपविभागीय अभियंता सु. या. भुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचे संबंधित विभागाच्या वतीने रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. तसेच जलदूत कार्तिक मेश्राम यांना मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्तिक मेश्राम यांचा सत्कार आला.

पाण्याची उपलब्धता, पाण्याचे समान वाटप, पाणी प्रदूषण, पाण्याच्या योग्य वापर करून पाणी संरक्षणाबाबत विविध मार्मिक उदाहरण देऊन पाण्याचे विशेष महत्त्व असल्याचे मत गोसीखुर्द उपसा सचिंन विभाग आंबाडीचे अधिक्षक अभियंता तथा जलजागृती सप्ताह उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष सं. फे. विश्वकर्मा यांनी केले.त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.

जलसंपदा विभाग व गोसीखुर्द उपसा सचिंन विभागाच्या वतीने जलप्रतिज्ञा देऊन बावनथडी, चुलबंद, कन्हान, सुरनदी व वैनगंगा नदीच्या (पाण्याचे) जलपूजन करण्यात आले.
बावनथडी, चुलबंद, कन्हान, सुरनदी व वैनगंगा नदीच्या पाण्याचे वाढते प्रदुषण होत आहे. मात्र त्यावर उपाय योजना करून नागरिकांना शुद्ध पाणी कसे पुरविणे जाईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन समितीचे सदस्य अविल बोरकर यांनी केले.

सप्ताहाच्या पहिल्या दिवशीच वैनगंगा नदीघाट जुना पुल महादेव मंदिराजवळ जलपूजा करण्यात आले. नंतर मोटार सायकल रॅलीला हिरवी शेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. मोटार सायकल रॅली वैनगंगा नदीघाटापासुन पोष्ट ऑफिस चौक मार्गे खामतलाव, शितला माता मंदिराजवळ समारोप करण्यात आले.

जलसंपदा विभागातर्फे दरवर्षी जलजागृती सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबवले जातात. यावर्षी देखील १६ ते २२ मार्च २०२४ या सप्ताह दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन केले. तसेच दिनांक १७ ते १९ मार्च, रोजी सकाळी १० वाजता ते सांयकाळी ६ वाजेपर्यत भंडारा जिल्हयातील सर्व तालुक्यातील पुर्ण झालेल्या व बांधकामाधिन प्रकल्पांचे लाभ क्षेत्रातील गावे व त्यांनतर प्रभात फेरी पाणी वापर संस्था व लाभधारक शेतकरी मेळावा चित्रकला स्पर्धा प्रबोधन पथनाटय व जलप्रतिज्ञा पाणीपट्टी वसुली प्रबोधन तसेच सर्व संबंधित कार्यकारी अभियंता,स.अ.श्रे.१ यांच्या हस्ते होणार आहे.त्यानंतर २१ मार्च २०२४ रोजी दुपारी १ वाजता शेळी उपसा सिंचन योजना व शेतकरी संवाद कार्यकारी अभियंता, अविल बोरकर यांच्या यानंतर २१ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जे.एम. पटेल महाविद्यालया येथे “वैनगंगा नदी प्रदुषण व त्यावरील उपाययोजना” या विषयावर वक्कृत्व स्पर्धा, समारोप दिनांक २२ मार्च २०२४ सर्व शासकीय कार्यालये तसेच शाळा महाविद्यालयात जलप्रतिज्ञा कार्यक्रम राबविणार आहे. त्यानंतर दुपारी आंबाडी वसाहत सभागृह अधिक्षक अभियंता गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ आंबाडी भंडारा येथे समारोप होणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना कोंडापे यांनी केले. प्रास्ताविक गोसीखुर्द उपसा सचिंन विभाग आंबाडीचे कार्यकारी अभियंता तथा जलजागृती सप्ताहाचे समन्वयक अ. वि. फरकडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अस्मिता जिलठे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र बेले, येळणे, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ आंबाडी, उपविभाग, गोसीखुर्द धरण विभाग वाही, पवनी, जिल्हा जलसंधारण विभाग इत्यादी अधिकारी -कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका

येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश …

इयत्ता 12वीचा निकाल उद्या

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved