Breaking News

“शेअर मार्केटच्या एका बिग बुल” पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे पंधरा लाख रुपयांची खंडणी मागून गावठी कट्टा कानाला लावून दिली जीवे मारण्याची धमकी पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

पाथर्डी ता. १८:- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगावच्या शेअर्स मार्केट चा व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाच्या डोक्याला पिस्तूल लावून तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याची घटना तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात घडली असून या घटनेत फसवल्या गेलेल्या तरुणाचे नाव अनिरुद्ध मुकुंद धस वय 30 रा. एरंडगाव ता शेवगाव असे आहे. या संदर्भात धस यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात धस यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे कि मी रविवारी शेवगाव येथून पुणे येथे आपला मित्र वैष्णव शिंदे यांच्या सोबत आपल्या चार चाकी वाहनाने जात असताना तालुक्यातील वृद्धेश्वर कारखाना ते तिसगाव च्या दरम्यान एका हॉटेल समोर माझ्या फॉर्च्युनर कंपनीच्या गाडीला मागून आलेल्या एका विना नंबर ची एक स्विप्ट गाडी आडवी आली.

त्यात असलेल्या अज्ञात आरोपींनी आमच्या गाडीला कट का मारला असे म्हणत { खोटी बतावणी करून } आम्हाला मारहाण करत त्यांच्या गाडीत जबरदस्तीने बसवले व तु शेअर मार्केटचे काम करतो, तु आम्हाला साठ लाख रुपये दे, नाही तर तुला दोरीने बांधुन विहीरीत टाकुन जिवे मारुन टाकु अशी धमकी देत आमच्या डोक्याला पिस्तूल {गावठी कट्टा } लावले. मी एव्हडे पैसे नाही असे म्हणताच त्यांनी पंधरा लाख रुपयांची मागणी केली. या घटनेने घाबरून मी माझा मित्र असलेला ओम वाळके याला फोन करून तू पंधरा लाख रुपये घेऊन तिसगाव रोडवर येण्यास सांगितले. या नंतर आरोपींनी आम्हाला अनेक ठिकाणी फिरवत शेवटी खरवंडी परिसरात नेले.

वाळके व दुसरा मित्र संग्राम काळे हे या परिसरात आले असताना त्या ठिकाणी एका दुचाकीवरून एक जण आला व आरोपींनी त्याच्याकडे पैसे देण्यास फोनवरून सांगितले. ज्या तरुणाकडे पैसे दिले तो तरुण व आमच्या गाडीतील एक जण असे पैसे घेऊन मिडसांगवी च्या दिशेने रवाना झाले तर मला व शिंदे याला आरोपींनी संध्याकाळी सात च्या सुमारास खरवंडी येथे असलेल्या एका पेट्रोल पंपा जवळ सोडून दिले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या घटनेचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

*ताजा कलम*

17 तारखेला रविवारी रात्री नऊ ते सव्वा नऊ च्या दरम्यान शेवगाव शहरातील गजबजलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पाथर्डी रोड ने येणाऱ्या एका ईरटीका गाडी मध्ये मागच्या सीटवर दोघांमध्ये सुंदोपसुंदी चालू होती त्यातील एकाने गाडीची मागची काच फोडून हेल्प मी हेल्प मी मला वाचवा असा आरडा ओरडा सुरू केला त्याच गाडीतील इतर लोकांनी उडून आत घेतले गाडी बसस्थानकाच्या क्रांती चौकाच्या दिशेने पैठण रोडला निघून गेली सदर घटना परिसरातील काही लोकांनी पाहिली परंतु शेवगाव ची एकूण सध्याची परिस्थिती पाहता आपण या भानगडीत पडायला नको नसती पोलिसांची झंझट आपल्या मागे नको म्हणून पुढे येऊन माहिती द्यायला कोणी तयार नाही शेवगाव शहरात शेअर मार्केट बुडालेल्या निधी अर्बन लिमिटेड यामुळे तर हे हिंसक वातावरण तयार झाले नाही ना अशी दबक्या आवाजात शेवगाव शहरासह तालुक्यात चर्चा सुरू आहे

*विशेष बाब*

*पाथर्डी पोलीस स्टेशन लग्नाला दाखल झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्याची खबर पाथर्डी तालुक्यातील काही गुन्हेगार मंडळींना ताबडतोब मिळाली म्हणजे “गंगाधर हि शक्तिमान नाही ना” अशी चर्चा सर्वसामान्य पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये घडू लागली आहे*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इनामी देवस्थान जमिनी प्रकरण

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल.रेकॉर्ड ऑफ राईट ला कब्जेदार,वहिवाटदार, मालक, …

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved