Breaking News

बोगस डुप्लीकेट निकृष्ट दर्जाच्या सुगंधीत तंबाखू व गुटखा तस्करी प्रकरणाची चौकशी करून तात्काळ अटक करा- चिमूर तालुका काँग्रेसची मागणी

चिमूर तालुक्यात अनेक प्रकारचे बोगस अवैध बेकायदेशीर रेती, सटटा, बोगस तंबाकु व गुटखा यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. व या सर्व धंद्यांना राजकीय संरक्षण दिल्या जात आहे.

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-दि.१५/०३/२०२४ ला ता. सावनेर जि. नागपुर पोलीस स्टेशन हददीतील हेटी पोलीस चौकी ठिकाणी गस्त सुरू असतांना भाजपचा झेंडा लावुन असलेली MH 34 BR 1331 हया पांढ-या रंगाच्या अर्टिगा या गाडीची तपासणी केली असता ३ लाख १ हजार रूपयाचा तंबाकु व गुटखा व ८ लाख रूपयांची कार असा अंदाजे १२ लाख रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. व कलम २७२,२७३,१८८ व ३२८ व अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ आणि त्या अंतर्गत नियम व नियमन २०१९ च्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये  नंदीनी ट्रॅव्हलसचे मालक नरेंद्र हजारे, पंकज गोठे, भाजप युवा मोर्चाचे तालुका महामंत्री व खडसंगी जि.प. सर्कल प्रमुख रोशन बन्सोड यांना सुगंधीत तंबाकु व गुटखा सह मुद्देमाल जप्त करून अटक करण्यात आली परंतु रोशन बन्सोड फरार आहे. हे सर्व चिमुर व खडसंगी परिसरातील रहिवासी आहे.

सामान्य जनतेच्या जिवाशी हा खेळ अनेक वर्षा पासुन सुरू आहे. रेती तस्करी, सट्टापट्टी, दारूबंदीच्या काळात अवैध दारू विक्री असे अनेक अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. या मधुन मिळणारी अवैध रक्कम ही राजकारणात वापरली जात आहे. सन २०२४ च्या घोषित झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व नकली सुगंधीत तंबाखू व गुटख्याचा वापर करून त्यांना प्रलोबन देऊन भाजपला मतदान करायला लावण्यासाठी हा साठा चिमूर तालुक्यात आणण्यात येत होते. या सर्व प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिमूर तालुका व चिमूर मतदारसंघ सुरक्षित नाही व अशा वातावरणात निवडणुका सुदधा शांततेत पार पाडणार नाही.ही बाब अत्यंत गंभीर असुन या मध्ये भाजपाच्या स्थानिक आमदाराची सुदधा चौकशी होणे आवश्यक आहे.

या व्यवसायाचे धागेदोरे लांब असुन बोगस खते, बोगस तंबाखू
व गुटख्याच्या व्यवसाय मध्यप्रदेश मध्ये जोरात चालत आहे.कारण या ठिकाणी तंबाकु व गुटखा हा अतिशय स्वस्त दरात मिळत असल्याची माहिती आहे. चिमूर तालुक्यात विकण्यात येतो तो तंबाकु निकृष्ट दर्जाच्या आहे. जनतेच्या जिवाशी व आरोग्याशी खेळणारा हा प्रकार आहे अशा बोगस तंबाखू व गुटखा तस्करी प्रकरणाचा छडा लावुन आरोपीची कसुन चौकशी करून टोळीचा पर्दाफाश करावा करावा अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन उपविभागीय अधिकारी चिमूर यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ.सतिश वारजुकर, चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजयजी गावंडे पाटील, चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटी सरचिटणीस गजानन बुटके, जेष्ठ नेते विवेक कापसे, शहर अध्यक्ष अविनाश अगडे, तालुका सचिव विजयी डाबरे, उपाध्यक्ष राजू चौधरी, उपाध्यक्ष ऍड.वंजारी, माजी नगरसेवक नितीन कटारे,मीडिया प्रमुख पप्पू शेख,बंडू हिवरकर,श्रीकांत गेडाम, सुधीर जुमडे,सुधीर भोयर,मंगेश घ्यार, अक्षय लांजेवार,बाळू बोबाटे,मिलिंद सहारे, रोशन नंन्नावरे,उपस्थित होते‌.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका

येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश …

इयत्ता 12वीचा निकाल उद्या

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved