Breaking News

“शेअर मार्केट” आणि “फॉरेक्स ट्रेडिंग” च्या नावाखाली गंडा घालणारी टोळी सक्रिय

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगांव :- ता. 20 मार्च 2024 बुधवार या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव शहरासह तालुक्यामध्ये सध्या “शेअर मार्केट” आणि “फॉरेक्स ट्रेडिंग” च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांना गंडा घालणारी टोळी सक्रिय असून अधिक परतावाचे आमिष दाखवून ते नागरिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडतात.
दरम्यान, शेवगांव शहरात आणी तालुक्यात सध्या लाखाला आठ ते दहा हजार रुपये व्याज देण्याचे आमिष दाखवून लाखो -करोडो रुपये नागरिकांकडून जमा करून भुलथापा देऊन सुरुवातीला दोन-चार महिने परतावा दिला जातो. त्यानंतर गाशा गुंढाळून पोबारा केला जातो. या दोन-चार महिन्यात अशा अनेक घटना घडल्या असून नागरिकांनी सतर्क होण्याची गरज आहे. अधिक परतव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा करून तीन-चार महिन्यातच तालुक्यातील पूर्व भागात सी. के. , डी. के. , बी. के. , एम. के. , पि. के. अशा बोगस नावांनी खासगी फायनान्स आणी निधी अर्बन लिमिटेड कंपन्यांनी गाशा गुंढाळून पोबारा केल्याची माहिती आहे. तो अद्याप पर्यंत या कंपन्यांचे विरोधात प्रत्यक्ष कोणीही पोलीस सायबर क्राईम अथवा स्थानिक प्रशासनाकडे तक्रार न केल्याने सरकारी यंत्रणानीं आर्थिक गुन्हे शाखा { सक्त वसुली संचालनालय } उर्फ ई. डी. सायबर क्राईम एल. सी. बी. आदी सरकारी यंत्रणांनी याकडे जातीने लक्ष घालून या भामट्यांच्या मुसक्या आवळून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यास मदत करावी.

*विशेष बाब*

*शेवगाव पोलीस स्टेशनच्या सूचना भलकावर स्पष्ट शब्दात लिहिले आहे शेअर मार्केट ऑनलाईन मार्केट क्रिप्टो करन्सी बिटकॉइन आर. एम. डी. अश्या विविध आर्थिक कंपन्यांकडून फसवणूक झालेले लोकांनी तक्रारी घेऊन येऊ नये???*

*ताजा कलम*

*काही सरकारी यंत्रणा कडून चिरीमिरी तर घेत नसेल????*
एवढे बिनधास्तपने भामटे गोरगरीब, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक दोन पैंसे मिळवण्यासाठी गुंतवणूक करतात आणि हे भामटे त्यांच्या हातावर तुरी देऊन पोबारा करतात. हे सर्व होत असताना, कोट्यवधी जमा करून खुशाल गंडा घालून पळून जातात. यांची चौकशी होत नाही का? कोट्यवधीचे ट्रांजेक्शन आयकर विभाग, आर्थिक गुन्हे शाखा आणि संबंधित विभागाला दिसत नाही का? असे असताना सुद्धा जर काहीच कारवाई होत नसेल तर या सरकारी यंत्रणांचे हात यात बरबटलेले तर नसेल अशीच शंका सर्वसामान्य जनतेच्या मनात उपस्थित होत आहे.

*{ क्रनाश }*

*थांबा मी माझ्यावालं वावर विकतो पण तुमच्या पैशांची परतफेड करतो लोकांचे पैसे काय तुझं वावर विकायला तु गोळा केले होते का ??? गुंतवणूक दारांचा संतप्त सवाल*

अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इनामी देवस्थान जमिनी प्रकरण

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल.रेकॉर्ड ऑफ राईट ला कब्जेदार,वहिवाटदार, मालक, …

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved