Breaking News

नागपूरसाठी तीन तर रामटेकसाठी आज एक अर्ज दाखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

विशेष प्रतिनिधी-नागपूर

नागपूर, दि. 22 : नागपूर सार्वत्रिक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज तीन अर्ज दाखल करण्यात आले. आतापर्यंत पाच अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. तर रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आज एक अर्ज दाखल करण्यात आला.

नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज नारायण चौधरी (सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया, कम्युनिस्ट) , साहिल तुरकर (अपक्ष) आणि दीपक मस्के (बहुजन महापार्टी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रामटेकसाठी प्रमोद खोब्रागडे (आंबेडकराईट पार्टी आफ इंडिया) यांनी अर्ज दाखल केला. रामटेकसाठी आज १०४ अर्जांची तर नागपूरसाठी १३१ अर्जांची विक्री करण्यात आली.

नामनिर्देशनपत्रे सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त 27 मार्चपर्यंत सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. 28 मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे.३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
******

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

२७ एप्रिल निषेध दिन – शिक्षक भारतीचे शिक्षकांना आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-२७ एप्रिल २००० रोजी महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयात …

अपघात – लग्न वऱ्हाडीना घेवून जाणारा ट्रक पलटी

गोंडमोहाळी फाट्यावरील घटना ट्रक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी जवळील शिरपूर येथून लग्न वऱ्हाडीना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved