Breaking News

प्रत्येक नागरिकांनी जल योध्दा बनण्याची गरज – किशोर दमाह

जलजागृती सप्ताह निमित्त जे. एम पटेल महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा यशस्वी

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674

(भंडारा, दि.२२) – पाणी हे जीवन आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. देशातील समृद्ध आणि विविध पाणी स्त्रोतांचा जपून, काटकसरीने वापर करावा. त्याकरीता प्रत्येक नागरिकांनी जल योध्दा बनण्याची गरज आहे असे प्रतिपादन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर दमाह यांनी केले.ते जलसंपदा विभाग, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ तसेच भंडारा पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जलजागृती सप्ताह निमित्त जे. एम. पटेल महाविद्यालय येथे “वैनगंगा नदी प्रदुषण व त्यावरील उपाययोजना” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधी प्राधिकरण विभागाचे सचिव बिजू गवारे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर दमाह, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव तथा जलजागृती सप्ताह अभियानचे सदस्य अविल बोरकर, एम.आय.आय. टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व जल कलशचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले होते. तसेच रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

लोक सहभागातून जल समृध्दीकडे जाण्याकरिता व्यक्ती, कुटुंब व समाज पाणी संरक्षणाचे कर्तव्य व भूमिका पार पाडाव्या. आमच्या पूर्वजाने नदी दृश्य स्वरूपात दाखवली, पुढच्या पिढीने विहिरीतील पाणी दिले, आजच्या पिढीने पाण्याची बॉटल दिली व भविष्यात बदल नाही झाला तर पुढील पिढीला पाण्याच्या कॅप्सूल चा वापर करावा लागेल. त्याकरिता जलयोध्दे घडवून जल साक्षरता करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी केले.
त्याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख सेवानिवृत्त प्राध्यापक वामन तुरिले, टेकेपार पाटबंधारे उपविभाग आंबाडीचे उपविभागीय अधिकारी गणेश वंजारी यांनी परिक्षकांची भुमिका पार पाडली. स्पर्धेत पाच महाविद्यालयातील विद्यार्थी -विद्यार्थ्यींनींनी सहभाग घेतला होता.

वक्तृत्व स्पर्धेकरिता भंडारा जिल्हयातील महाविद्यालयाच्या अपेक्षा वैद्य, निकिता बान्ते, करिना टेकाम, पुजा सेंदुरकर, सेजल फटे, सलोनी वासनिक, अयुब अंसारी, निलांशू रॉय, टिनुताई कराडे इत्यादी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.वक्तृत्व स्पर्धेमध्ये वैनगंगा नदीचे प्रदूषणामध्ये -प्रामुख्याने सांडपाणी, शेतीमधलं रसायन युक्त पाणी, कारखान्यामधील रासायनिक पाणी, जलपर्णीच्या प्रकोप, यात्रा व सांस्कृतिक कार्यक्रमांमधून पूजेच्या कचरा, नदी काठावरील अतिक्रमण, घनकचरा नदीमध्ये सोडणे, नदी काठावरील वृक्षकटाई, रेतीचा बेसूमार उपसा, वाढती धरणातील गाळ, सांडपाण्यावर प्रक्रिया, शुध्द पाणी अशाप्रकारे विविध मुद्द्यांवर प्रामुख्याने भर देऊन त्यावरील शासकीय माध्यमातून उपाय योजनांची मांडणी केली. त्यात जलजागृती, बेस्ट वॉटर शुद्धीकरण, नदी काठावर जैव विविधता पार्क उभारणे. वृक्षारोपण करून नदीला शुद्ध पाणी येण्यासाठी विविध उपक्रमांमधून राबविण्याची गरज आहे.

सुशिक्षित नागरिक सुध्दा पिण्याचे व वापरण्याचे पाणी कोणते. याकडे दुर्लक्ष करून पिण्याच्या वापर सर्रास वापर करत आहेत. माझं पाणी म्हणून विनाशाकडे नेत आहेत. तसेच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे पाणी प्रदूषित होत आहे. म्हणून आज पिण्यायोग्य पाणी केवळ एक टक्का आहे. त्याचे योग्य जतन करणे आवश्यक आहे. असे मत ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव तथा जलजागृती सप्ताह अभियानचे सदस्य अविल बोरकर यांनी व्यक्त केले.जोपर्यंत आपल्याला पिण्या योग्य मुबलक पाणी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत पुढचा भविष्य सेव करून शकत नाही. पाण्यामुळेच विविध आजार होत असतात. म्हणून प्रत्येकाने पाण्यासाठी जनजागृती करावे असे मत विधी प्राधिकरण विभागाचे सचिव बिजू गवारे यांनी व्यक्त केले. मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन वैनगंगा नदी प्रदूषण व त्यावरील उपाय योजना या विषयावर मार्गदर्शन केले.

बक्षीस वितरण पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर दमाह, जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, मराठी विभाग प्रमुख सेवानिवृत्त प्राध्यापक वामन तुरिले, टेकेपार पाटबंधारे उपविभाग आंबाडीचे उपविभागीय अधिकारी गणेश वंजारी, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव तथा जलजागृती सप्ताह अभियानचे अशासकीय सदस्य अविल बोरकर, गडेगाव आगार वनपरिक्षेत्र अधिकारी गौरी नेवारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजा सेंदुरकर, टिनू कराडे, सेजल फटे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन तसेच सहभागी विद्यार्थी -विद्यार्थ्यींनींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोजराज श्रीरामे व प्रास्ताविक ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव तथा जलजागृती सप्ताह अभियानचे सदस्य अविल बोरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कल्पना कोडापे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जे. एम. पटेल महाविद्यालयातील अंतर्गत हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पन्निकर, भंडारा पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र बेले, गंगाधर हटवार, रोशन सेलुकर, सुशीलकुमार अतिलकर, विजय महानंदे, वाशिम खान पठाण, राजकुमार बावणे, राजाराम चरडे, सारिका सेलोकर, आरती चामट, मिनल राजपूत, कल्पना नागरिकर, पूजा पाटील, सचिन देवगिरीकर, उमा गभणे, प्रफुल महाजन, चोखा बुरडे, प्रियंका चिताळकर, प्रा. विनी ढोमणे, प्रा. शाम डफरे, डॉ. प्रताप पटले, प्रा. ममता राऊत, प्रा. पदमा राव, डॉ. भिमराव पवार, डॉ. जितेंद्र किरसान, डॉ. संगिता कटरे, डॉ.विजया कन्नाके, वैष्णवी थोटे, रिया तिवाडे, घनश्याम चकोले, जिल्हयातील महाविद्यालय तसेच जे. एम. पटेल महाविद्यालयातील प्राध्यापक-कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अपघात – लग्न वऱ्हाडीना घेवून जाणारा ट्रक पलटी

गोंडमोहाळी फाट्यावरील घटना ट्रक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी जवळील शिरपूर येथून लग्न वऱ्हाडीना …

इनामी देवस्थान जमिनी प्रकरण

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल.रेकॉर्ड ऑफ राईट ला कब्जेदार,वहिवाटदार, मालक, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved