जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चंद्रपूर दारूबंदी पथकाच्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की ११आँक्टोबरला भिसी,कपरला मार्गावरील टि-पाँईटवर दुपारच्या वेळी ११:३० ते १२:३० वाजताच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातून अवैध रीत्या चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथे अवैध दारूची तस्करी करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती दारूबंदी पथक चंद्रपूर यांना मिळाली. पोलिसांनी कपरला टी. – पॉईंट वर नाकाबंदी लावली. ११:५० वाजताच्या दरम्यान पोलिसांना उमरेड कडून पांढऱ्या रंगाची गाडी ( क्रमांक एम. एच. – ३१, डी. सी. ७२८१ ) येतांना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता,
पोलिसांना गाडीच्या डिक्कीत आणि मधल्या सीटवर देशी दारूचे १८० एम. एल. चे ४८० नग ( अंदाजे किंमत – ९६ हजार ) ९० एम. एल. चे ३५०० नग ( अंदाजे किंमत – ३ लक्ष पन्नास हजार ), ९० एम. एम. चे १५०० नग ( अंदाजे किंमत – १लक्ष पन्नास हजार ), अशी एकूण पाच लक्ष ९६ हजार रुपयाची देशी दारू आढळुन आली आहे. गाडीची अंदाजे किंमत ६ लक्ष, असा एकुण ११ लक्ष ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गाडीचालक प्रशांत शेखर डोंगरे ( वय २६, रा. – गौतम वॉर्ड – हिंगणघाट ) याने पोलिसांनी चौकशी केली असता सांगितले की, सदर दारू मालेगाव येथील बंडू पाटील यांना देण्याचे हिंगणघाट येथील अविनाश नवरखेडे यांनी सांगितले. त्यावरून पोलिसांनी प्रशांत डोंगरे, अविनाश नवरखेडे, बंडू पाटील ( मालेगाव, चिमूर ) व निखिल प्रमोद काटकर ( वय २२, रा. शास्त्री नगर हिंगणघाट ) या चारही आरोपीविरुद्ध दारूबंदी पथक चंद्रपूर चे पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड यांच्या फिर्यादीवरून भिसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस विभागाकडून पुढील तपास सुरु आहे.