Breaking News

मनपा चुनाव च्या पुर्व तैयारी संदर्भात युवासेनेने घेतली आढावा बैठक

नागपुर :- भाजप ची सत्ता असलेल्या नागपुर महानगर पालिका वर यंदा बदल घडवण्याचा दृष्टीकोणातुन शिवसेना प्रणीत युवासेनेने पदाधिकार्यांना कामाला लावलेले आहे त्याच संदर्भात सोमवारी युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी यांचा उपस्थितीत नागपुरात आढावा बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीत कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली व युवासेना विस्तारक रामटेक लोकसभा सर्वेश गुरव, चंद्रपूर लोकसभा विस्तारक मिथिलेश त्रिपाठी, युवासेना भंडारा गोंदिया विस्तारक निलेश हॅलोनडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शैकडो युवकांनी युवासेनेते प्रवेश घेतला. सदर आढावा बैठक मनपा चुनाव च्या पुर्व तैयारी संदर्भात होती.

बैेठकीला मार्गदर्शन करताना रुपेश कदम यांनी नागपूर महानगर पालिका निवडणुकी करीता तयारीला लागण्यास सांगितले तसेच सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्न घेऊन नागपूर महानगर पालिकेच्या अधिकारी यांना जाब विचारून जनतेचे प्रश्न सोडवण्यास सांगितले. माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र जी फडणवीस यांनी मुंबई महानगर पालिकेत एक हाती सत्ता आणायचं स्वप्न पाहत असून ते कधीच पूर्ण होणार नाही व नागपूर महानगर पालिकेत भाजप ची सत्ता पाडुन शिवसेनेची सत्ता आनुन दाखवु असे वक्तव्य रुपेश कदम यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता (जिल्हा युवधिकारी) हितेश यादव,( जिल्हा समनव्यक)शशिकांत ठाकरे, (जिल्हा चिटणीस) शशिधर तिवारी,(उपजिल्हा युवा अधिकारी) आकाश पांडे,ऋषिकेश जाधव, आशिष हाडगॆ,निलेश घोले,मंगेश ठाकरे,(शहर युवा अधिकारी)अक्षय मेश्राम (शहर सचिव)गौरव गौरव गुप्ता, गौरव सावरकर, (शहर समन्वयक)तुशार कोल्हे,अब्बास अली, आशीष हाडगे,,उपशहर अधिकारी कृष्णा बालपांडॆ अविनाश पांडे,पवन घुग्घुसकर, रोहित तायवाडॆ,रमन सिंग सैनी,अभिषेक धुर्वे,गौरव शाहू अक्षय पांगड,अजय गुप्ता,(विधानसभा संघटक)कुलदिप उपाध्याय, स्मित कापसे,धनंजय पारवॆ(उप विभाग अधिकारी),शुभम फाले,यश मुळॆ,शुभम तिरपुडॆ, आकाश रेवतकर,श्रीकांत खंदाळॆ,शाहरुख शेख,अनिरुद्ध बंसोड,अमन बन,राहुल क्नोजिया,जयप्रकाश वर्मा,आकाश गुप्ता, मुकेश शाहु,पवन यादव,दुर्गश शाहु,विपुल पुंजॆ,मनिष तिवारी,शुभम शेंडॆ,आशिष हरने,(युवती सेना) प्रिती काकडॆ,सोनल ठाकुर, युवा सेना नागपुर लोकसभा क्षेत्र चे सपुर्ण पदाधिकारी व युवासैनिक उपस्थीत होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved