Breaking News

झुडपी जंगलात युवकाचा मृतदेह आढळला संशयास्पद

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

बल्लारपूर :- पूर्व दिशेला बल्लारपूर विसापूर फाट्याजवळ असलेल्या जवळपास २०० मीटर अंतरावर झुडपी जंगल आहे त्या जंगलामध्ये इशांत परकोटवर वय ३३ राहणार गणपती वार्ड बल्लारपूर ‌या युवकाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.

मिळालेल्या माहितीआधारे विसापूर फाट्याजवळ एका युवकाला सायंकाळी ५ : ०० वाजताच्या सुमारास दुर्गंधी चा वास येवू लागला त्यामुळे त्याने जवळ जावून पाहले असता त्याला बेवारस अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याने याची माहिती त्याने पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविण्यात आला.

संबंधित युवकाजवळ विषाची बॉटल व इलेक्ट्रिक बिल मिळाले त्यामुळे सदर युवक बल्लारपूर येथील रहिवासी असल्याचे समजले. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved