
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमूर :- स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याकरिता तसेच चिमूर जिल्हा निर्मिती करिता विदर्भ राज्य आंदोलन समिती चिमूरच्या वतीने नवीन बसस्थानक, तहसील कार्यालय समोर रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात आले.
कोरोना काळातील वीज बिल कमी करण्यात यावे, २०० युनिट वीज बिल नियमितपणे मोफत देण्यात यावे, शेतकऱ्यांना शेतीकरीता मोटर पंप चालविण्यासाठी वीज पुरवठा नियमित
करण्यात यावे. पेट्रोल-डीझेल व गॅस दरवाढ कमी करण्यात यावे, साप चाऊन मरणाऱ्या व्यक्तीला जीवितहानी मोबदला देण्यात यावा याकरिता केंद्र शासन तसेच राज्य शासन यांचे निषेधार्थ रस्ता रोको व जेल भरो आंदोलन चिमूर शहरात करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत डवले, अध्यक्ष यांनी केले असता विदर्भ आंदोलनाची कार्य व ध्येय धोरण पटवून दिले व युवकांनी जागृत होऊन या विदर्भ आंदोलनाच्या चळवळीत सहभागी होऊन हिम्मत द्यावी असे प्रस्ताविकातून सांगण्यात आले.
जनहितांच्या मागण्या लक्षात घेता आपण आपल्या स्तरावरून आमच्या मागण्यांविषयी सकारात्मक विचार करून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा आंदोलनाचे रुद्ररूप निर्माण होऊन आपल्या हक्कासाठी व न्यायासाठी जनता आपल्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे माजी राज्यमंत्री डॉ.रमेश गजभे यांनी आपल्या भाषणात सांगितले, त्याचप्रमाणे विदर्भ वेगळा न होण्याचे मुख्य कारण म्हणजे विदर्भातील स्थानिक राजकीय नेते आहेत असा सडसडीत आरोप डॉ. इसनकर यांनी सत्ताधारी व विरोधीपक्ष केंद्र व राज्य सरकार यांच्यावर केला. तसेच नारीशक्ती विदर्भ राज्य करण्यासाठी नेहमी तत्पर असेल असे आव्हान प्रीती दिडमुठे यांनी केले. विदर्भाचे महत्व कित्ती मोलाचे आहे हे पिठाळे सर यांनी मार्गदर्शनातून पटवून दिले. तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सुरज तितर यांनी पार पाडले व विदर्भ राज्य आंदोलन समिती चिमूर तर्फे तहसील कार्यालय चिमूर येथे निवेदन देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रशांत डवले, अध्यक्ष विदर्भ आंदोलन समिती चिमूर, हेमंत इसनकर, संयोजक वि.रा.आ.स.चिमूर, रामेशकुमार गजभे, माजी आमदार विधानसभा क्षेत्र चिमूर, गजानन अगडे, जेष्ठ कार्यकर्ता शेतकरी संघटना चिमूर, संजय पिठाळे, माजी.प्राध्यापक चिमूर, नरेंद्र राजूरकर, समाजसेवक चिमूर, प्रवीण निशाणे, सचिव वि.रा.आ.स.चिमूर, आदित्य पिसे, उपाध्यक्ष वि.रा.आ.स.चिमूर, सौ. प्रिती दिडमुठे, महिला अध्यक्ष वि.रा.आ.स.दक्षिण नागपूर, सूरज तिसरे, कोषाध्यक्ष वि.रा.आ.स.चिमूर, रामकृष्ण लाभे, शेतकरी संघटना चिमूर, प्रमोद खोब्रागडे, उपसरपंच ग्रा.पं. म्हसली,शितल सोरदे, सदस्य वि.रा.आ.स.चिमूर, प्रवीण दिडमुठे, सदस्य वि.रा.आ.स.चिमूर, परशुराम ननावरे, शेतकरी संघटना चिमूर, अशोक मेश्राम, सुनील कारेकर, काशिनाथ चांदेकर, जैराम पोहीनकर, प्रकाश पाटील, स्वप्नील हिंगे, जितेंद्र सहारे, योगेश अगडे, प्रवीण मंगर, सौरभ धोटे, गणेश पाटील, अमोल घानोडे, सचिन चट्टे, राहुल मांडवकर, शरद सावसाकडे, मनीषा प्रकाश, आदी संघटना कार्यकर्ते उपस्थित होते.