Breaking News

दिव्यांगनांना योजनेचा लाभ मिळण्याकरिता तहसिलदार यांना दिले निवेदन

दिव्यांगना अंतोदय यादीत समाविष्ट करा – भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटने ची मागणी

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

पोभूर्णा :- भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना हि एकमेव संघटना म्हणून जनमानसात रूजत आहे. दिव्यांगांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध न्याय व हक्कासाठी सतत लढा देत आहे.दिव्यांगाना अंत्योदय यादीत समाविष्ट करून योजनेचा लाभ मिळावा यासाठी भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना वारंवार लढा देत आहे.शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय यादीमध्ये समाविष्ट करून त्वरित अन्नशिधापञिका उपलब्ध करून द्या अशी मागणी भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना तालुका पोंभुर्णा तर्फे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी केली.

शासन निर्णय हे फक्त कागदोपत्रीच रंगवल्या जाते.माञ त्याचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचत नाही.दिव्यांना लाभ मिळाला नाही तर भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करू असा इशारा भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष रफीक कुरेशी , तालुका सचिव अविशांत अल्गमवार यांनी दिला.
यावेळी निवेदन देताना नवनाथ पिपरे , सौ. अरुणा अल्लीवार, सौ. शारदा मोगरकार , राजेश्वर पातढे , विट्ठल वासेकर , राजन गुरुनुले , फिरोज पठान , भीमराव मानकर , दुर्योधन ढोले, अंकुश लिंगलवार, प्रफुल ढोडरे, शुभम धोढरे, संतोष सतपुते , ताराबाई उराडे उपस्थित होते

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा …

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved