
बॅरि.शेषराव वानखेडे जयंती निमित्त मनपा तर्फे अभिवादन
नागपूर, ता.२४ : नागपूर महानगरपालिकेचे प्रथम महापौर व माजी मंत्री बॅरि.शेषराव वानखेडे यांच्या १०६ व्या जयंती निमित्त महापौर श्री.दयाशंकर तिवारी, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी आज दिनांक २४.०९.२०२१ रोजी सकाळी म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील हिरवळीवर बॅरि.वानखेडे यांच्या पुर्णाकृती पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी अति.आयुक्त राम जोशी, उपायुक्त श्री. निर्भय जैन, राजेश भगत, पशुचिकीत्सा अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सहा.जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, उपमहापौरांचे स्वीय सहाय्यक राजू भांडारकर आदी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेचे स्थापने नंतर २० जूलै १९५२ रोजी प्रथम महापौर म्हणून निवड झाल्यानंतर बॅरि.शेषराव वानखेडे यांनी १९५४ व १९५५ याप्रमाणे २ वेळा महापौर पद भूषविले होते.
त्यांचे कार्यकाळात शहराच्या विकासात दूरगामी प्रभाव टाकणा-या भूमीगत मलवाहिनी, कन्हान जलप्रदाय प्रकल्प, गरीब विद्यार्थ्यांसाठी निशु:ल्क प्राथमिक शिक्षण इ. योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या.महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री, विधान सभेचे उपसभापती, सभापती तसेच मुंबई क्रिकेट असोशिएशन व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष इ. पदे त्यांनी भुषविली होती.