
आता परिसरातील विद्यार्थ्यांना मिळणार हिंदी मध्यमा तून पण शिक्षण
उच्च दर्जाचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून मिळावे यासाठी प्रयतन सुरू
प्रतिनिधी:-नागेश बोरकर दवलामेटी(प्र)
दवलामेटी(प्र):-प्रायव्हेट शाळेत अमाप पैसा खर्च होतो परिसरातील नागरिकांना हा खर्च न परवडणारा असून जिल्हा परिषद चा शासकीय शाळेतून उच्च दर्जाचे शिक्षण देऊन विद्यार्थ्याचे भविष्य उज्वल करण्याचे धेय उराशी बाळगून आम्हीं शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करत राहणार त्यासाठि आमदार समिरजी मेघे, शिक्षणं सभापती भारती ताई पाटील, सभापती रेखा ताई वरठी व जिल्हा परिषद सदस्य ममता ताई धोपटे, यांचे सहकार्य लाभणारचं अशी अपेक्षा करतो असे प्रतिपादन दवलामेटी ग्रामपंचायत चा सरपंच सौ रीता ताई उमरेडकर यानी भूमिपूजन, उद्घघाटन प्रसंगी आप्ल्या भाषणातून बोलून दाखवले.जिल्हा वार्षिक योजना २०२० – २१ अंतर्गत ग्रामपंचयत दवलामेटी येथे हिंदी माध्यमिक डिफेन्स वर्ग खोलीचे मंजुर बांधकाम रू १३ .५ लक्ष किमतीचे असून सदर कामाचे भूमिपूजन व जिल्हा खनिज योजना सन २०१९ – २० अंतर्गत बांधकाम केलेल्या वर्ग खोलीचे उद्घघाटन मा. सौ. भारती ताई पाटील सभापती अर्थ शिक्षण व क्रीडा समिती जी. प. नागपुर. यांचा हस्ते करण्यात आले. विद्यार्थी बाल बलिकानी लेझिम हे पारंपारिक नृत्य सादर करुन मान्यवरांचे स्वागत केले.
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती सौ. भारती ताई पाटील सभापती अर्थ शिक्षण व क्रीडा समिती जी. प. नागपुर, सौ. रेखा ताई वरठी सभापती प. स. नागपुर उपस्थीत होते.कार्य क्रमाचे आयोजन सरपंच सौ रीता ताई उमरेडकर उप सरपंच प्रशांत भाऊ केवटे , ग्रामविकास अधिकारी विष्णू जी पोटभरे यानी ग्रामपंचयत चा ईतर सदस्यांचा सहकार्यातून केले.
यावेळी सरपंच सौ रीता ताई उमरेडकर, ग्रामविकास अधिकारी विष्णू जी पोटभरे, ग्रा. पंचायत सदस्य प्रकाश जी मेश्राम, श्रीकांतजी रामटेके, गजानन जी रामेकर, शुभांगीताई पाखरे, अर्चनाताई बनसोड, शकुंतलाजी अभ्यंकर, छाया ताई खिल्लारे, उज्वला ताई गजभिये व ग्रा.पं. कर्मचारी उमेश वाघमारे, मनोज गणवीर, संध्या शिरसाट, अनामिका ताई उपस्थीत होत्या.तसेच सामजिक कार्यकर्ते रोहित राऊत, छत्रपती शेंद्रे, रवी पाखरे, वामन वाहने, अनवर अली, मधुकर गजभिये, जनार्दन गजभिये, रमेश गोमासे, कोरे भाऊ आणि मोठया संख्येने गावकरी उपस्थीत होते.