
नागपूर दि. 26 : राज्यातील ग्रामीण भागापर्यंत मोफत विधी सेवा तसेच विधी सेवा प्राधिकरणामार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती त्या योजनांमध्ये कोण लाभार्थी आहे, त्याची माहिती राज्यातील प्रत्येक गावापर्यंत व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविण्याबाबत सर्व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांना सूचना प्राप्त आहेत. या मोहिमेला यशस्वी बनविण्यासाठी विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांचे सहकार्य गरजेचे असल्यामुळे आपण या राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेली मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायधीश अभिजित ग. देशमुख यांनी सांगितले.
भारत स्वातत्र्याची 75 वर्षे आजादी की का अमृत महोत्सव म्हणून व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यशाळेचे 25 वर्षे या अनुषंगाने 2 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण देशात कायदेविषयक जनजागृती व 7 ते 14 नोव्हेंबर या कालावधीमध्ये सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कालावधीमध्ये देशात विधी सेवा सप्ताह साजरा करण्याचे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने ठरविले आहे. त्यानुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मंचावर सहाय्यक धर्मदाय आयुक्त माणिक सातव, उपाध्यक्ष तथा वकील संघाचे उपाध्यक्ष अनिल ठाकरे, जिल्हा वकील संघाचे सचिव सतीश देशमुख तसेच सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.याद्वारे कामकाजात येणाऱ्या कायेदेविषयक समस्यांचे निराकरण करता येईल. तसेच जिल्ह्यातील सवर् सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्था सक्रीय सहभाग घेऊ शकतात, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायधीश माणिकराव सातव यांनी सांगितले.
या कामासाठी वकील संघाचे वकील सहकार्य करतील, अशी हमी ॲड. अनिल ठाकरे यांनी दिली. ॲड. सतीश देशमुख यांनी नागरिकांना विविध कायद्याबाबत सूचना दिल्यात.ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण खोली क्र. 605 सहावा माळा जिल्हा न्यायालय इमारत सिव्हील लाईन, नागपूर यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थेचे 100 पदाधिकारी उपस्थित होते.