Breaking News

सुराबर्डी ग्रा.प वर पुन्हा ईशवर गणवीर -मुकेश महाकाळकर सरपंच -उपसरपंच पदावर आरूढ -काँग्रेस ने पुन्हा मिळवली प्रतिष्ठा

प्रतिनिधी नागेश बोरकर – दवलामेटी (प्र)

दवलामेटी(प्र) नागपूर पंचयात समिती अंतर्गत सोनेगाव जी प सर्कल मधील ग्रा.प सुराबर्डी काँग्रेस ने पुन्हा ताब्यात घेऊन आपली प्रतिष्ठा कायम राखली.बुधवारी दुपारी सम्पन्न निवडणूकी मध्ये काँग्रेस चे ईशवर गणवीर सरपंच तर मुकेश महाकाळकर उपसरपंच पदावर 5 विरूद्ध 4 मतांनी निवडून आले.

या ग्रा.प मध्ये या पूर्वी झालेल्या सरपंच-उपसरपंच पदावरील निवडणूकित ईशवर गणवीर व मुकेश महाकाळकर उपसरपंच पदावर निवडून आले होते.मात्र या निवडणुकीत गुप्तेतेचा व नियमांचा भंग झाल्याला आरोप करीत विरोधी सदस्य आंबटकर व तायडे यांनी नागपूर जिल्ह्याधिकारी यांचे कडे प्रकरण दाखल केले होते.विस्तुत सुनावणी नंतर तत्कालीन निवडणूक पीठासीन अधीकारी कापटे यांनी केलेली निवडणूक प्रक्रिया नियमबाह्य स्वरूपाची सिद्ध झाल्याने गत महिन्यात ही निवडणूक व पदे रद्दबातल ठरवून पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले होते.या निर्देशा नुसार नागपूर ग्रा.तहसील कार्यलयाने काल बुधवार ला रीतसर प्रक्रिया पूर्ण करून ही निवडणूक सम्पन्न केली.

दुपारी पीठासीन अधिकारी रवींद्र परतेकी यांनी निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ केला.काँग्रेस नेते नानभाऊ गावंडे यांच्या नेतृत्वात व जी प च्या शिक्षण सभापती भारती पाटील,नागपूर प.स सभापती रेखा वरठी,अनिल पाटील, काँग्रेस चे वाडी शहराध्यक्ष शैलेश थोराने, माजी सरपंच रमेश महाकाळकर यांच्या नेतृत्वात नियोजन करून पुन्हा ईशवर गणवीर व मुकेश महाकाळकर यांना सरपंच -उपसरपंच पदाच्या रिंगणात उतरविले.

तर दुसऱ्या बाजूने सरपंच पदासाठी कविता आंबटकर व सुभाष तायडे यांनी सरपंच -उपसरपंच पदासाठी अर्ज सादर केला.गुप्त मतदान प्रक्रियेनंतर पीठासीन अधिकारी यांनी काँग्रेस से ईशवर गणवीर याना सरपंच तर मुकेश महाकाळकर यांना उपसरपंच पदासाठी ग्रा.प सदस्य कल्पना राऊत,भाग्यश्री निकुडे, दीपाली गुरनुले असे 5 मते तर विरोधी गटाला 4 मते मिळाल्याचे जाहिर करून विजयाचा निकाल घोषित केला.ही सर्व प्रक्रिया प्रयत्नाने घडवून आणणारे विरोधी पक्ष पदाधिकारी यांना 1 मत आपल्या बाजूने न वळविता आल्याने अपयशाला सामोरे जावे लागले.

निकाल घोषित होताच बाहेर जेष्ट नेत्यांनी विजयी उमेदवाराचे पुष्पहार घालून व मिठाई वितरण करून अभिनंदन केले.तर या प्रसंगी उपस्थित सोनेगाव ग्रा.प चे ,उपसरपंच कृष्णा सरीन,दृगधामना सरपंच साधना कराडे, उपसरपंच बंडू गजभिये,सोनेगाव ग्राप सदस्य विनोद लंगोटे,वर्षा पिल्ले,अरुणा मानवटकर,नंदा गडेकर,सह प्रकाश वायकर,धनराज महाडूके,सुनील महाडूके,रमेश तलकारे,चेतन महाकाळकर,प्रमोद गुरनुले,कमलेश महल्ले,अनुज सिंग,प्रफुल सावरकर, विलास काचोरे,महेंद्र झोडापे,अमित आगरकर,अभय वर्मा,विकास सिंग,अंकुश महाकाळकर ,विनोद गुरनुले,शेखर राऊत शैलेंद्र शेंदरे,शँकर गणवीर,शुभम गणवीर,धनराज ढोके,सुरेश महाकाळकर,रमेश तलवारे,मंगेश भोंडवे,तेजराज नेवारे,गोपाल बोटरे, नारायण सोनवणे,नरेंद्र आनंदे,दीपक येलेकर,संतोष लोनबैल,मनीष ढाले, बबलू सहारे, मारोतराव वाढइ,अक्षय भोंडवे,प्रकाश वायकर,राजेंद्र वायकर,संदीप महाडूले,रामा काचोरे,मिलिंद काचोरे,मुकेश पाल,मधु नेवारे ,देवराव नेवारे,मयूर,सचिन येलेकर यांनी फटाके फोडून व गुलाल उधळून विजयी उमेदवारांचे स्वागत व अभिनंदन केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवडज वाहतुकीच्या नावावर अवैध वसुलीचा धंदा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथुन जवळच असलेल्या रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवजड वाहतुकीच्या नावाखाली …

वाढतोय उष्माघाताचा धोका, खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून तापमान सातत्याने वाढत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved