
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात महालगावच्या शेतशिवारात दोन दिवस आगोदर वाघ हरणाच्या शिकारीत असताना विहिरीमध्ये पडला होत्या त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले होते.
ही घटना ताजी असताना काल अचानक ह्याच वाघाने भटाळा येथील शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांला गंभीर जखमी केले होते तर आज चंदनखेडा येथील शेतशिवारात वायगाव रोडला लागून असलेल्या शेतकरी रणदिवे यांच्या धानाच्या शेतात करंट लागून वाघांचा शेतशिवारात दुर्दवी मृत्यू झाला, परंतु नेमका हाच तो वाघ आहे का याची पुढिल चौकशी वनविभागाचे कर्मचारी करीत आहे.