
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर दि.12 नोव्हेंबर: राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 13 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12.15 वाजता महावितरण बाबुपेठ कार्यालय, चंद्रपूर येथे आगमन, दुपारी 12.30 वाजता महावितरण सबस्टेशन लोकार्पण समारंभास उपस्थित, दुपारी 1.30 वाजता हिराई अतिथिगृह येथे आगमन, दुपारी 1.30 ते 3.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव, दुपारी 3.30 वाजता भटाळी कोळसा पाईप कन्व्हेअर लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, सायंकाळी 5.15 वाजता हिराई अतिथीगृह येथे आगमन तर सायंकाळी 5.30 वाजता नागपूर कडे प्रयाण.