Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

सुधारित  एकही वीज कर्मचारी लसीपासून वंचीत राहू नये : पालकमंत्री खापरखेडा व कोराडी येथील लसीकरण केंद्राना पालकमंत्र्यांची भेट

नागपूर दि .5 विदयुत क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी हे फ्रंटलाईन वर्कर आहेत.कोरोना काळात विदयुत विभागाने उत्तम कामगिरी केली. त्यामुळे एकही वीज कर्मचारी लसीपासून वंचीत राहू नये .सर्वानी लसीकरण करून आपले व समाजाचे कोविडपासून रक्षण करावे ,असे आवाहन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज केले. खापरखेडा व कोराडी येथील लसीकरण केंद्राना पालकमंत्र्यांनी आज …

Read More »

यशवंत स्टेडीयम अद्ययावतीकरणाच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणार – डॉ. नितीन राऊत

नागपूर, दि. 05 : यशवंत स्टेडीयमचे अद्ययावतीकरण करुन 20 हजार प्रेक्षक क्षमता असणारे अद्ययावत स्टेडीयम बांधण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, व्यापारी संकुल, म्युझियम व गेस्ट हाऊस व पार्किंगचा समावेश राहणार आहे. या अद्ययावतीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत …

Read More »

सर्व योजना सामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना : डॉ. नितीन राऊत

  नागपूर दि. ५ एप्रिल शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी पूरक व पाठपुरावा करणारी यंत्रणा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना नागपूर जिल्ह्यामध्ये राबविण्याचे संकेत ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले. शासनाच्या विविध योजना व त्याची अंमलबजावणी यासाठी नागपूर जिल्हा अग्रेसर रहावा. सामाजिक न्याय, कौशल्य …

Read More »

सर्व योजना सामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना : डॉ. नितीन राऊत

    नागपूर दि. ५ एप्रिल शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी पूरक व पाठपुरावा करणारी यंत्रणा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना नागपूर जिल्ह्यामध्ये राबविण्याचे संकेत ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले. शासनाच्या विविध योजना व त्याची अंमलबजावणी यासाठी नागपूर जिल्हा अग्रेसर रहावा. सामाजिक न्याय, …

Read More »

स्मार्ट सिटीचे काम प्रशंसनीय : महापौर एडवायजरी फोरमची बैठक संपन्न  दि. ०५ एप्रिल, २०२१ स्मार्ट सिटीचे काम प्रशंसनीय : महापौर एडवायजरी फोरमची बैठक संपन्न नागपूर, ता.०५ : कोरोनाच्या दिशा निर्देशांचे पालन करण्यात आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्याची सूचना पोलिसांना देण्यामधे नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेड (NSSCDCL) यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. स्मार्ट सिटीचे काम प्रशंसनीय आहे, या शब्दात महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी आपली भावना व्यक्त केली. स्मार्ट सिटी एडवायजरी फोरमची बैठक नुकतीच स्मार्ट सिटीच्या सभाकक्षात पार पडली. महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत संपन्न बैठकीमध्ये राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री. कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस.(IAS) आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेश मोरोणे यावेळी उपस्थित होते. डॉ. शील घुले, महाव्यवस्थापक, ई-गर्व्हनेंस विभाग, नागपूर स्मार्ट सिटी यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीच्या वतीने नि:शुल्क वाई-फाई ची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्याचा लाभ मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑनलाईन शिक्षणामध्ये झाला. स्मार्ट सिटीच्या वतीने कोव्हिड रुग्णांसाठी डॅशबोर्ड ची व्यवस्था करण्यात आली होती. महापौरांनी नाईट विजन कॅमरा लावण्याची सूचना केली. तसेच दाटी-वाटीच्या क्षेत्रात स्मार्ट पार्किंग ची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर वाहने पार्किंग करणे बंद केले पाहिजे आणि पादचा-यांची जागा मोकळी ठेवायला पाहिजे. श्रीमती भुवनेश्वरी एस. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले की, ही बाब नागपूरसाठी अभिमानास्पद आहे की “नरचरिंग नेबरहुड चॅलेंज” मध्ये संपूर्ण सहाराष्ट्रातून नागपूर ची निवड केन्द्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने केली आहे. त्यांनी पुढे स्ट्रीटस फॉर पीपल उपक्रमाबद्दल माहिती फोरम ला दिली. स्मार्ट सिटी च्या वतीने प्रभाग ३० नेहरुनगर झोन मध्ये ५ उपक्रम हाती घेण्यात आले आहे. याचा लाभ लहान मुलांना आणि त्यांचा परिवाराला होईल. या उपक्रमाचा उददेश रस्त्याला पादचा-यांसाठी सुरक्षित लहान मुलांसाठी खेळणेयोग्य बनवायचे आहे, ही माहिती डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी सादरीकरणाच्या माध्यमाने दिली. महापौरांनी आमदार श्री. मोहन मते आणि आमदार श्री. अभिजीत वंजारी यांची या कामात मदत घेण्याचे आवाहन केले. डॉ. उमरेडकर यांनी सीताबर्डी बाजारपेठ आणि सक्करदरा तलावाजवळ घेतलेल्या उपक्रमांची माहिती सादर केली. क्षेत्राधिष्ठित विकास कार्यक्रम अंतर्गत भरतवाडा, पुनापुर, पारडी आणि भांडेवाडी क्षेत्रात सुरु असलेल्या ‍विकास कामाची फोरम ला माहिती देण्यात आली. या क्षेत्राचा विकास प्रारुप राज्य शासनाकडे प्रलंबित असल्याने कामाची गती सुध्दा कमी आहे. बैठकीत तेजेंदर सिंह रेणु, अध्यक्ष, नागपूर रेसीडेंसिएल होटल असोसिएशन, लीना बुधे, सेंटर फार सस्टेनेबल डेव्हलपमेंट, विवेक रानडे, सिव्हील एक्शन ग्रुप, कौस्तुभ चटर्जी, ग्रीन विजील फाऊंडेशन, डॉ. प्रशांत डायगव्हाणे, डीन सिविल इंजीनियरिंग विभाग, भानुप्रिया ठाकुर, कंपनी सचिव, नेहा झा, मुख्य वित्त व लेखा अधिकारी, राजेश दुफारे महाव्यवस्थापक (मोबिलिटी) व राहुल पांडे, मुख्य योजनाकार आदी उपस्थित होते.

Read More »

दहा झोन अंतर्गत ५१ नवीन लसीकरण केंद्र होणार सुरू होणार

नागपूर, ता.०५ : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जास्तीत जास्त लसीकरण व्हादवे यासाठी मनपातर्फे दहाही झोन अंतर्गत एकुण ५१ नवीन लसीकरण केंद्र प्रस्तावित आहेत. यापैकी १० लसीकरण केंद्र सोमवार (ता. ५) पासून सुरू करण्यात आले. २६ केंद्रांवर नियोजित मनुष्यबळ, डेटा एंट्री …

Read More »

मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१४४ व्यक्तिं विरुध्द कारवाई

मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१४४ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता. ५ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवारी (५ एप्रिल) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ५४ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे २७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. …

Read More »

सोशल मीडियांवरील अफवांपासून दूर राहा, डॉक्टरांचा सल्ला घ्या ‘कोव्हिड संवाद’ कार्यक्रमात डॉक्टरांचा सल्ला : मनपा-आय.एम.ए.तर्फे ’फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद

सोशल मीडियांवरील अफवांपासून दूर राहा, डॉक्टरांचा सल्ला घ्या ‘कोव्हिड संवाद’ कार्यक्रमात डॉक्टरांचा सल्ला : मनपा-आय.एम.ए.तर्फे ’फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद नागपूर, ता. ५ : कोव्हिड विषाणू आणि त्यामुळे आलेली आपत्ती हे सत्य आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या आणि गैरसमज पसरविणाऱ्या संदेशांपासून सावध राहा. थोडा जरी ताप …

Read More »
All Right Reserved