Breaking News

सर्पदंशाने शेतकरी युवकाचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे वहाणगांव वासियांचे आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – सध्या रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून विज वितरण कंपनी कडून कृषी पंपाना रात्रौला विज दिली जाते. त्यामूळे शेतपिकाला पाणी देण्याकरीता वहाणगाव येथील शेतकरी कुमार नितिन जुमनाके या युवकास दिनांक.२३/१०/२०२३ ला रात्रौ १० :३० वाजताच्या सुमारास सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाला.लाईट दिवसा असती तर शेतकरी युवकाला जीव गमवावा लागला नसता.

म्हणून या शेतकरी विरोधी धोरण राबविणाऱ्या जुलमी सरकारचा वहाणगाव वासीय शेतकऱ्यांकडून उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथील आवारात जाहीर निषेध करण्यात आला व रात्री बेरात्री लाईट देण्याऎवजी दिवसा शेतकऱ्यांना शेती पंपासाठी इलेक्ट्रीक लाईन देण्यात यावी अन्यथा मृत शेतकरी यांचे प्रेत हलविणार नाही अशी मागणी करण्यात आली. यावेळी शेगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मेश्राम तथा चिमूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज गभने यांच्या उपस्थितीत शांततेच्या मार्गाने आंदोलन पार पडले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved