Breaking News

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन सुरू असून सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषिवर तात्काळ कारवाई करण्याबाबत जिल्हा नियोजन समिती सदस्य गजानन बुटके यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर यांना दिले निवेदन.

मागील अनेक वर्षांपासून शासनाने चिमूर तालुक्यात रेती घाट लिलाव न केल्याने सोनेगाव. उसेगाव. गोंदोडा. वाघेडा. शिरपूर. मोठेगाव. गोरवट. चिमूर व जंगल व जंगल परिसरातील नदी नाले घाट येथून सरासपने जेसीबी. पोकल्यांड लाऊन 24 तास ट्रक व ट्रॅक्टरच्या माध्यमातून अवैध उपसा केल्या जात असल्याने शासनाचा संपूर्ण महसूल बुडत असल्याने शासन महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तेवढ्याच मोठ्या प्रमाणात मुरुमाचे सुधा अवैध उत्खनन केल्या जात आहे.

त्यामुळे सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोशिवर कार्यवाही करणाकरिता माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य गजानन बुटके यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर याना निवेदन देण्यात आले.निवेदन देतेवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य गजानन बुटके, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य भरत बंडे, प्रा. राजू दांडेकर, सुधीर जुंमडे, रेहान शेख, विजय शेंडे,रामदास विठाले व अन्य काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार …

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved