Breaking News

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांमध्ये एम. पी. एस. सी. मार्फत निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तेजस प्रवीण मगर याची पी.एस.आय. { पोलीस उपनिरीक्षक } म्हणून तर किरण प्रवीण मगर याची तालुका कृषी सहायक अधिकारी म्हणून सख्ख्या भावांची निवड झाल्यामुळे आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगामध्ये काही तरुण वर्षानुवर्षी एम.पी.एस.सी. यू.पी.एस.सी.च्या परीक्षा देऊन यशस्वी होत नाहीत.

परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवत तेजस आणि किरण मगर यांनी मूळचे पाथर्डी तालुक्यातील येळी गावचे रहिवासी असलेले मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा” या उक्तीला न्याय देत वडील शेवगांव शहरातील रामनगर येथील जि. प. प्राथमिक शाळेत शिक्षक असताना सचोटीने अभ्यास करून यशाला गवसणी घातली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ताहेरभाई शिराजुद्दीन पटेल ईरफान नजमुद्दीन पटेल या बंधुनी नुकतेच आयोजित केलेल्या शीरखुर्मा पार्टीमध्ये शोभा शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या बंधूंचा सन्मान करून आपल्या शेवगाव शहराचा आणि तालुक्याचे नाव मोठा करण्याचे आवाहन यावेळी केली आहे.

*ताजा कलम*

*जिद्द आणि प्रामाणिक कष्ट याचे जीवावर कुठलेही अवघड साध्य हे निश्चित मिळवता येते एकाच घरात दोघे सखे भाऊ मोठ्या अधिकारी पदावर पोहोचल्याने शेवगाव शहरासह तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होताना दिसत आहे शीरखुर्मा पार्टीमध्ये या दोन्ही उन्हाचा सत्कार केल्यामुळे दुग्ध शर्करा योग जुळून आल्याचे उपस्थित मान्यवरांनी म्हटले*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

अपूर्ण घरकुलाच्या बांधकामाकरीता विशेष मोहीम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात रमाई, शबरी व मोदी आवास योजनेंतर्गत सन 2016 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved