Breaking News

लैंगिक अत्याचार व अपहरण प्रकरणी आरोपीला झाली तेरा वर्षीची शिक्षा

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

बल्लारपूर :- पोलीस स्टेशन बल्लारपूर अंतर्गत अप.क्र 778/2018 कलम 367,377 भांदवी सह कलम 3 (A), 4,5, (L) (M) 6 पोक्सो केस नंबर 69/18 अंतर्गत दाखल गुन्ह्यात आरोपीला 13 वर्षाची शिक्षा व 5000/- रु दंडाची शिक्षा बल्लारपूर सत्र न्यायालयाने सुनावली आहे. प्राप्त माहितीनुसार बल्लारपूर येथील संतोषी माता वॉर्ड ,विश्वशांती चौक परिसरात वास्तव्यास असलेले फिर्यादी सौ. मिनाक्षी दिपक बागेसर यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनला अशी तक्रार दाखल केली की या घटनेतील आरोपी नामे विवेक खुशाल रंगारी वय-30 वर्ष रा.संतोषी माता वार्ड बल्लारपूर याने पीडितेचा ( फिर्यादी ) चा 9 वर्षीय मुलगा याचे दिनांक 09 जुलै 2018 ते 15 जुलै 2018 दरम्यान अपहरण करून वारंवार अनैतिक कृत्य करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दिनांक 15 जुलै 2018 ला पोलीस स्टेशन बल्लारपूर ला दाखल करण्यात आली, या घटनेचा सखोल तपास पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि स्वप्नील निराळे व हेड कॉन्स्टेबल विनोद बावणे, भगवान मेश्राम यांनी केला असून न्यायालयात केस दाखल केली या अनुषंगाने न्यायालयाने दिनांक 26 ऑगस्ट 2021 ला निकाल देतांना सदर गुन्ह्यातील आरोपीला कलम 367 भांदवि मध्ये 3 वर्ष शिक्षा व 2000 रु दंड व दंड न भरल्यास 1 महिना शिक्षा तसेच सह कलम 6 पोक्सो ऍक्ट अंतर्गत 10 वर्ष शिक्षा व 3000/- रु दंड व दंड न भरल्यास आणखी 3 महिन्याची शिक्षा मा. दीक्षित साहेब अति सत्र न्यायाधीश चंद्रपूर यांच्या न्यायालयाने सुनावण्यात आली आहे. सरकारी वकील अँड. देवेंद्र महाजन यावेळी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved