
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- नवीन युवा पिढी तंबाखूच्या आहारी जाणार नाही या उद्देशाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात २६ पानठेल्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. कोटपा कायदा ची २००३ प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस विभागामार्फत शासकीय कार्यालये, हॉस्पिटल, शाळा परिसरातील पानठेल्यावर सदर कार्यवाही करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांना तंबाखुमूळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती व जाणीव होईल. तसेच नवीन पिढी तंबाखूच्या आहारी जाणार नाही, हा उद्देश सफल होईल. कोटपा कायदा ची २००३ अंमलबजावणी तसेच जास्तीत जास्त लोकांना यांच्या दुष्परिणामाची जाणीव होणे हा सुध्दा कारवाईचा उद्देश आहे. तंबाखू, सिगारेट, जर्दा याला नकार करा, निरोगी आरोग्याचा स्वीकार करा हा कानमंत्र देण्यात आला. सदर कार्यवाहीमध्ये जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर, अन्न निरीक्षक सातकर , पोलीस निरीक्षक अंभोरे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत येणारे समुपदेशक मित्रंजय निरंजने, सामाजिक कार्यकर्ता तुषार रायपुरे, अतुल शेंद्रे, दुर्गाप्रसाद बनकर यांनी मोलाची कामगिरी केली.