Breaking News

भुमी अभिलेख कार्यालयामध्ये इंदिरा नगर वासीयांच्या प्लॉटची नोंद लवकरच होणार

भारतीय क्रांतिकारक संघटनेला मिळाले यश

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर : – अनेक वर्षांपासून चिमूर येथील इंदिरा नगर वासीयांची मागणी प्रलंबित असतांना विविध संघटनेचे माध्यमातून पट्टे मिळण्याबाबत ची आंदोलने करून जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदने देऊनही याकडे पाठ फिरवली जात होती. परंतु याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधी यांनी लक्ष दिले नाही.मागील काही वर्षाच्या अगोदर श्रमिक एल्गार संघटनेच्या अध्यक्ष ऍड.पारोमिता गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांना चिमूर तालुक्यातील झोपडपट्टी तसेच शासनाने दिलेल्या प्लॉट ला भोगवटा कर लावून शासन कर वसुली करीत आहे.परंतु त्यांना त्यावर पूर्णपणे मालकी हक्क काबीज करता येत नव्हता शासनाने अतिक्रमण काढू नये व सर्वांना त्यांच्या हक्काचे पट्टे मिळवून देण्यासाठी निवेदन दिले परंतु चिमूर तहसीलचे तहसीलदार संजय नागतीळक यांना वारंवार निवेदने व चर्चा केली असता नेहमी या विषयावर चर्चा करायला ते तयार होत नव्हते हेतुपुरस्पर याकडे दुर्लक्ष केले जात होते. परंतु कुठल्याही प्रकारे शासनाच्या नाकर्ते धोरणाला न जुमानता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातुन निवेदन दिले व त्यास यशस्वी रित्या पाठपुरावा करून जिल्हाधिकारी यांनी उप विभागीय अधिकारी यांना आदेश दिले कि लवकरात – लवकर भुमी अभिलेख कार्यालयात इंदिरा नगर वासीय जनतेच्या प्लॉट ची नोंदणी करण्यात यावी असे आदेश दिल्याबद्दल भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा , टेरेन्स कोब्रा , जिल्हा प्रमुख सारंग दाभेकर , तालुका अध्यक्ष आरिफ वारसी , व अन्य संगटनेच्या कार्यकर्त्यांनी
यावेळी जिल्हाधिकारी यांचे आभार मानले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार …

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved