
प्रतिनिधी नागपूर
नागपूर :- नागपूर, दि. 23: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज नागपूर विमानतळावर तीन दिवसीय दौऱ्यासाठी आगमन झाले. 23 ते 25 या कालावधीत ते नागपूर -अमरावती -यवतमाळ या तीन जिल्हयातील विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.आज विमानतळावर आगमन झाल्यानंतर नागपूर,जिल्हाधिकारी विमला आर.,विशेष पोलीस महानिरिक्षक नागपूर परिक्षेत्र डॉ. शेरींग डोरजे, नागपूरच्या पोलीस सहआयुक्त अश्वती डोरजे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व अन्य अधिकारी उपस्थित होते. आज सायंकाळी राजभवनला ते मुक्कामी असणार आहेत.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या तीन दिवसांच्या या दौऱ्यामध्ये बुधवारी सकाळी 11 वाजता अमरावती येथील शिवाजी कृषी महाविद्यालयाला भेट देणार आहे. 11.30 वाजता शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय भवनाचे उद्घाटन करणार आहेत . दुपारी 2.30 वाजता अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ गावाला भेट देणार आहेत. दुपारी 4.40 वाजता यवतमाळ जिल्ह्यातील नीळोना येथील दीनदयाळ प्रबोधिनीला भेट देणार आहे रात्री त्यांचा मुक्काम यवतमाळ येथील विश्रामगृहावर असेल.
25 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता यवतमाळ येथील गोधनी रोड वरील प्रयास व येथे राज्यपाल कोषारी यांच्या हस्ते वृक्षारोपण होणार आहे. तसेच प्रेरणास्थळ येथे आयोजित प्रार्थना व वृक्षारोपण कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. स्वर्गीय जवाहरलाल दर्डा इंग्रजी माध्यम शाळेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण व आरोग्य शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी पावणेतीन वाजता राज्यपालांचे यवतमाळ येथून नागपूर विमानतळावर आगमन होईल. दुपारी तीनला ते मुंबईकडे प्रयाण करतील.