
प्रतिनिधी – कैलास राखडे
ब्रम्हपुरी :- जयंती चित्रपटाची कथा हि आजच्या युवा बहुजन समाज बांधवांना सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारी तसेच सामाजिक वास्तविक तेचे दर्शन घडविणारी आहे. या सिनेमाला ब्रम्हपुरी येथील अलंकार सिनेमा गृहात जयंती चित्रपटासाठी अफाट गर्दी केली होती. प्रेक्षकांच्या मागणीला दाद देत ब्रम्हपुरी येथील सामाजिक बांधिलकी जोपासणारे विवेक रामटेके, निखिल राऊत यांनी काही मित्रांबरोबर व डॉ. जिवने यांच्या अथक परिश्रमाने चित्रपट लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी धडपड केली.ग्रामीण भागातील लोकांना,विद्यार्थ्यांना प्रौढांना जयंती सिनेमा पुन्हा पाहता यावा,
यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ देवश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते जितु शेंडे,. विपीन नगराळे, प्रा..चंदन नगराळे, मोंटू पिल्लारे , अनुकूल शेंडे या सामाजिक वैचारिक मंडळीनी अर्थ साहाय्य करून हा सिनेमा ब्रह्मपुरी व आजुबाजूच्या गावातील येथील विद्यार्थी, प्रोढ , सामाजिक कार्यकर्ते यांना दुपारी व संध्याकाळी शनिवारी व रविवारी ला अलंकार सिनेमा येथे दाखवला.
लोकांचा प्रतिसाद पाहून जयंती चित्रपटातील मुख्य कलाकार ऋतुराज वानखेडे यांनी ब्रम्हपुरीला भेट देऊन प्रेक्षकांसोबत संवाद साधल्याने प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित झाला.कलाकारांना प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळाल्याने अनेकांनी सेल्फी घेऊन जयंती चित्रपटाला व कलाकारांना ब्रम्हपुरी परिसरातील नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला.जयंती चित्रपटाची टिम व मुख्य नायक(संत्या) ऋतुराज वानखेडे यांनी प्रेक्षकांची मन जिंकली व चित्रपट नाही तर शिवराय व भिमराव यांचा विचार समाजात पोहचवा असे सांगितले सर्वांनी हा चित्रपट बघावा यातून तरूणांना उर्जा व प्रोत्साहन देण्यारा व प्रेरणादायक आहे.
महापुरुषांच्या विचार लोकांपर्यंत पोहोचावा या साठी चित्रपट नक्की बघण्यावे असे यावेळी सांगितले.जयंती चित्रपट लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विवेक रामटेके निखिल राऊत डॉ.जिवने, जगदीश गोमिला , विक्की शेंडे, किरण मेश्राम, अभिजित कोसे, राजेश माटे , आतीश झाडे यांनी सहकार्य केले